SSC Result : दहावीत पडले कमी गुण? पूनर्मूल्यांकनासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज, शुल्कासह जाणून घ्या प्रक्रिया
Maharashtra Board SSC Result 2025 : इयत्ता दहावीच्या निकालात मुलींचा वरचष्मा पुन्हा दिसून आला. मुलींनी बाजी मारली. तर कोकणने सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाची परंपरा कायम ठेवली. पण ज्यांना कमी गुण मिळाले आहेत, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

इयत्ता दहावीत परंपरेप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलांपेक्षा उत्तीर्ण होण्यात मुलींचा टक्का अधिक आहे. कोकण विभागाने सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाची परंपरा कायम ठेवली आहे. राज्यातील 9 विभाग निहाय निकालात कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के इतका लागला. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल आला. त्यातच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना गुण कमी मिळाले असे वाटत असेल तर त्यांना गुणांचा पडताळा करता येईल. त्यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
गुणांची पडताळणी
विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करता येईल. उद्यापासून १४ मे पासून २८ मे पर्यंत २०२५ पर्यंत गुण पडताळणी करता येईल. त्यासाठी मंडळाकडे अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करता येईल. शुल्क भरुन विद्यार्थ्यांना गुणांचा पडताळा करता येईल. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार आहे.
एक किंवा दोन विषयात नापास झाले तरी विद्यार्थ्याला इयत्ता ११ वीत प्रवेश दिला जातो. त्यांना एटीकेटीची सोय करुन देण्यात आली आहे. इयत्ता १२ वी ला जाण्यापूर्वी फेब्रुवारीतील परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि ११ वीची परीक्षा पास झाला तर तो १२ वीसाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकतो.
या महिन्यात गुण पडताळणी व पुनर्मूल्यांकन
जर विद्यार्थ्याला कोणत्याही विषयाच्या गुणांबाबत शंका असेल, तर त्याला गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. हा अर्ज १४ मे ते २८ मे २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने mahasscboard.in या संकेतस्थळावरून सादर करता येतील. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.
१५ मेपासून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज
विद्यार्थ्यांचे १५ मेपासून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. दहावी परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या तीन संधी उपलब्ध होणार आहेत. जून-जुलै २०२५ मध्ये होणार्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज १५ मेपासून करता येणार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले.
अशी आहे प्रक्रिया
विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार आहे. या प्रक्रियेत एकूण गुणांची गणना करण्यात येईल.
verification.msbshse.co.in या संकेतस्थळावर लॉगिन करा
तुमचा आसन क्रमांक आणि इतर तपशील भरा
ऑनलाईन शुल्क जमा करा
आता सबमिट करा
