Maharashtra Budget 2022 : नाशिकसह 3 ठिकाणी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था; जाणून घेऊ अर्थसंकल्पातील 5 महत्त्वाच्या घोषणा

| Updated on: Mar 11, 2022 | 4:08 PM

रशिया-युक्रेन युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसे संकेत यापूर्वी मंत्री अमित देशमुख यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही दिले होते. अजित पवारांनी आज त्याचीच पूर्तता केली.

Maharashtra Budget 2022 : नाशिकसह 3 ठिकाणी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था; जाणून घेऊ अर्थसंकल्पातील 5 महत्त्वाच्या घोषणा
अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला.
Follow us on

नाशिकः वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. आता नाशिकसह (Nashik) मुंबई, (Mumbai) नागपूरमध्ये (Nagpur) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. तसेच येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. अजित पवार यांनी दुपारी दोनच्या सुमारास अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली. ते म्हणाले की, देशातील होतकरू युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेश संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येईल. मुंबई येथे सेंट जॉर्ज येथे पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था आणि नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. रशिया-युक्रेन युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसे संकेत यापूर्वी मंत्री अमित देशमुख यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही दिले होते. अजित पवारांनी आज त्याचीच पूर्तता केली.

अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणा अशा…

  1. मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी. सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार. 8 कोटी रुपये खर्च करून 8 मोबाइल कर्करोग निदान वाहने सुरू करणार. सर्व जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्‍णालय उभारणार. टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन देणार.
  2. प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारणार. त्यासाठी 3 हजार 183 कोटींचा निधी. पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. येथे सगळेच उपचार एका छताखाली मिळणार. पुण्याजवळील हवेली येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी 25 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
  3. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार. त्यासाठी 100 कोटींचा निधी देणार. तर येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा.
  4. येत्या दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देणार. पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार. जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद. भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
  5. शेततळ्याच्या अनुदानात वाढ करणार. देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार. प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प उभारणार. या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार. एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्य. मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी.


इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!