AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

नाशिक महापालिकेची निवडणूक विहित वेळेच्या आत होत नसल्याने अखेर नगरविकास विभागाने प्रशासकाची नियुक्ती केलीय. त्यानुसार येणाऱ्या 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव हे कामकाज पाहणार आहेत.

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!
Nashik Municipal Corporation.
| Updated on: Mar 11, 2022 | 9:30 AM
Share

नाशिकः नाशिककरांना (Nashik) दिलासा देणारी एक अतिशय महत्त्वाची बातमी. अखेर महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या (Election) तोंडावर सत्ताधारी भाजपने केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ चार वर्षांनंतर का होईना मागे घेतली आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात ही करवाढ लागू करण्यात आली होती. त्यानुसार एक एप्रिल 2018 नंतरच्या मालमत्तांना अव्वाच्या सव्वा घरपट्टी लागू करण्यात आली होती. अखेर हा ठराव बेकायदेशीर ठरवत त्याची अंमलबजावणी करू नये, असे आदेश महापौर सतीश कुलककर्णी यांनी आपल्या शेवटच्या महासभेत दिले. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचा शेवटही गोड केला. होय, महापालिकेत जेष्ठ नगरसेवक आणि विद्यमान महापौर असणाऱ्या सतीश कुलकर्णी यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारत यापुढे महापालिका निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केलीय. सलग पाच वेळा नगरसेवक, उपमहापौर आणि महापौर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आपल्या शेवटच्या भाषणातही सतीश कुलकर्णी भावनिक झालेले दिसले.

चुका केल्या दुरुस्त

नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. सध्या ओबीसी आरक्षणामुळे राज्य सरकारने तीन महिने निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी सुरू केलीय. मात्र, आज ना उद्या ही रणधुमाळी सुरू होणार आहे. हे ध्यानात घेता सत्ताधारी भाजपने यावेळी अनेक चुकांची दुरुस्ती केली. खरे तर यापू्र्वी महापालिका हद्दीमध्ये कारखाने, औद्योगिक वसाहती कायम रहाव्या म्हणून कर कमी ठेवला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या काळात हा कर वाढवण्यात आला. याविरोधात नगरसेवक आणि नागरिकांचाही अंसतोष होता. ही करवाढ अखेर मागे घेण्यात आली.

शिवरायांचा पुतळा साकारणार

नाशिक महापालिकेमध्ये शिवरायांचा ब्रांझ धातूचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासंबंधीचे पत्र जगदीश पाटील यांनी दिले होते. महापौरांनी या पुतळा उभारणीस मंजुरी दिलीय. पुणे महापालिकेतही शिवरायांचा पुतळा आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेत पुतळा उभारण्यात येणार असल्याचे समजते. महापालिकेच्या सहा विभागात प्रत्येक एक तक्रार निवारण केंद्र, सिडकोत अग्निशमन केंद्र, भारतनगरमध्ये घरकुलाची उभारणी असे निर्णयही यावेळी घेण्यात आले.

महापालिकेवर प्रशासक

नाशिक महापालिकेची निवडणूक विहित वेळेच्या आत होत नसल्याने अखेर नगरविकास विभागाने प्रशासकाची नियुक्ती केलीय. त्यानुसार येणाऱ्या 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव हे कामकाज पाहणार आहेत. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत येत्या 15 मार्चला संपतेय. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.