AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिकमधील सातपूर येथील लाहोटीनगरात एका उद्योजकाच्या घरी बाळाच्या मानेवर सुरा ठेवून दरोडेखोरांनी चक्क 50 तोळे सोने लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. उद्योजक बाबूशेठ नागरगोजे यांच्या घरी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे हाती मोठे घबाड लागल्याने दरोडेखोरांनी घरातल्या मंडळीसमोर डान्स केला. देवाला नमस्कार केला. तुमचा आणि आमचा देव सारखाच असा उपदेश करून भामटे पसार झाले.

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!
नाशिकमध्ये उद्योजकाच्या घरी पडलेल्या दरोड्याने एकच खळबळ उडाली आहे.
| Updated on: Mar 08, 2022 | 9:41 AM
Share

नाशिकः उद्योगनगरी नाशिकची (Nashik) अतिशय वेगाने क्राइनगरीकडे (Crime) सुरू असलेली वाटचाल काही केल्या थांबायला तयार नाही. आता सातपूर येथील लाहोटीनगरात एका उद्योजकाच्या घरी दीड वर्षाच्या बाळाच्या मानेवर सुरा ठेवून दरोडेखोरांनी चक्क 50 तोळे सोने आणि लाखोंचा ऐवज लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. उद्योजक बाबूशेठ नागरगोजे यांच्या घरी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे हाती मोठे घबाड लागल्याने दरोडेखोरांनी घरातल्या मंडळीसमोर डान्स केला. देवाला नमस्कार केला. तुमचा आणि आमचा देव सारखाच असा उपदेश करून भामटे पसार झाले. मात्र, या घटनेमुळे पुन्हा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पोलीस (Police) नेमके काय करत आहेत, असा प्रश्न विचारला जातोय.

आधी केली रेकी…

उद्योजक बाबूशेठ नागरगोजे यांचा अंबड लिंकरोडवर स्टील कॉर्पोरशनचा उद्योग आणि अहमदनगर येथे ओम फोर्ज नावाचा कारखाना आहे. दरोडा टाकण्यापूर्वी एक दिवस अगोदर दरोडेखोरांनी उद्योजक बाबूशेठ नागरगोजे यांच्या घराची रेकी केल्याचे समोर आले आहे. दरोडेखोरापैकी एका व्यक्तीला नागरगोजे यांच्या घरातील महिलेने काय पाहताय म्हणून हटकलेही होते. मात्र, त्याने थातूरमातूर कारण सांगत यांना टाळले आणि परिसरातून पाय काढता घेतला. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकल्याचे समोर येत आहे.

उद्योजक घराबाहेर पडले अन्…

उद्योजक बाबूशेठ नागरगोजे कंपनीत जाण्यासाठी घराबाहेर पडले आणि बरोबर अर्ध्या तासानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या घरी पाऊल ठेवले. त्यांनी अगदोर घरातील महिलांना धमकावले. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या. ऐवज कुठे ठेवलाय याची माहिती करून घेण्यासाठी दीड वर्षाच्या बाळाच्या नरड्यावर सुरा ठेवून धमकी दिली. घरातील सगळ्यांना देवघरात डांबले आणि ऐवज बळकावला.

घरात श्वान, पण सीसीटीव्ही नाही…

उद्योगक नागरगोजे यांच्याकडे रॅट व्हीलर जातीचा श्वान आहे. कोणीही आला की तो अंगावर भुंकतो. त्यामुळे अनेकांची त्यांच्या घरात पाऊल ठेवायचीही हिंमत नसते. दरोडेखोरांनी या श्वानाला काहीतरी खाऊ घातल्याचा संशय आहे. दुसरीकडे नागरगोजे इतके मोठे उद्योजक असूनही त्यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही बसवला नाही. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. उद्योजकांच्या माहितीतील व्यक्ती या दरोड्यात सहभागी असावा, अशी शक्यता वर्तवली जातेय.

इतर बातम्याः

ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!

युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.