नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना दीर्घ पल्ल्याचा प्रवास कसा करायचा याची चिंता पडलीय. कारण ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी बस बंद आहेत. या कठीण परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. सिटीलिंकने आता नाशिकरोड ते दिंडोरी या ग्रामीण भागात सिटी बसच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत.

नाशिक - दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?
नाशिकच्या ग्रामीण भागातही सिटी बसने फेऱ्या सुरू केल्या आहेत.
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 12:24 PM

नाशिकः एसटीचा (ST) संप कधी मिटणार माहित नाही. एकीकडे सरकारने माघार न घेणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना दीर्घ पल्ल्याचा प्रवास कसा करायचा याची चिंता पडलीय. कारण ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी बस बंद आहेत. या कठीण परिस्थितीत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. सिटीलिंकने आता नाशिकरोड ते दिंडोरी या ग्रामीण भागात सिटी बसच्या (City Bus) फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना थेट रेल्वेतून उतरल्या उतरल्या बसमध्ये बसून गाव गाठता येईल. सकाळी सहा ते सायंकाळी सात दरम्यान प्रत्येक अर्ध्या तासाला एक बस आहे. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थी, चाकरमानी आणि नागरिकांची कमी पैशात लवकर घर गाठण्याची चिंता मिटणार आहे.

कसा आहे मार्ग?

नाशिकरोडवरील स्टँडवरून ही बस निघेल. ती द्वारका, निमाणी, म्हसरूळ, तळेगाव मार्गाने दिंडोरीकडे जाईल. या शिवाय निमाणी ते पाथर्डीगाव, द्वारका, नागजी, इंदिरानगर तसेच निमाणी ते अमृतानगर या मार्गाने कमोदनगर, पाथर्डी फाटा व नवीन सीबीएस ते पिंपळगाव बसवंत या मार्गावरही फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता मिटणार आहे.

अन् मार्ग सुकर

नाशिकमध्ये सिटीलिंक बससेवेची 8 जुलै 2021 पासून सुरुवात झाली. त्यात पाच टप्प्यात 250 बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या 100 आणि डिझेलवर चालणाऱ्या 50 बस आहेत. उर्वरित 100 बसला सीएनजी मिळत नसल्याने त्या बंद होत्या. मात्र, पाथर्डी येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने 2 मार्च रोजी प्रकल्पाचा नारळ फोडला. त्यामुळे महापालिकेचा बस सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला.

बस आल्याने नो टेन्शन

नाशिक महापालिकेच्या ताफ्यात आता शंभर नव्या सीएनजी सिटी बस येणार आहेत. या निर्णयामुळे शहरातील सिटी बसची संख्या वाढणार आहेच. सोबत इतक्या दिवस तोट्यात असणाऱ्या व्यवस्थापनाला आर्थिक बळही मिळणार आहे. इंधन म्हणून डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्तच पडते. एका बसला 120 किलो सीएनजी लागतो. त्यानुसार आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे.

चांगला प्रतिसाद

दिवाळीपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करताना अव्वाच्या सव्वा लूट सुरू आहे. हे पाहता सिन्नर ,ओझर, त्रंबकेश्वर, भगूर, गिरणारे, सायखेडा, मखमलाबाद या ग्रामीण भागातून सिटीलिंक बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नाशिक उद्योनगरी. ग्रामीण भागातून अनेक कामगार नाशिकमध्ये रोजगारासाठी येतात. त्यांना रोज खासगी वाहनाने प्रवास करून येणे अवघड असते. सातपूर भागात अनेक कामगारांचा रोज राबता असतो. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी सिटीलिंक बससेवेने उत्तम जबाबदारी पार पाडली आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...
कुर्ल्यात बस ड्रायव्हर मद्यधुंद की ब्रेक फेल? संतप्त जमावानं बेदम धुतल
कुर्ल्यात बस ड्रायव्हर मद्यधुंद की ब्रेक फेल? संतप्त जमावानं बेदम धुतल.
एकनाथ शिंदे अडूनच... गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच
एकनाथ शिंदे अडूनच... गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच.
'योग्य वेळी योग्य निर्णय...', जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?
'योग्य वेळी योग्य निर्णय...', जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?.
कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार?आदिती तटकरेंनी क्लिअर सांगितले
कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार?आदिती तटकरेंनी क्लिअर सांगितले.
मारकडवाडीचा मुद्दा दिल्लीपर्यंत अन् विधानसभेतही रंगले सवाल-जवाब
मारकडवाडीचा मुद्दा दिल्लीपर्यंत अन् विधानसभेतही रंगले सवाल-जवाब.
Kurla Accident : ज्या बसने झाला जीवघेणा अपघात, त्या बसची अवस्था काय ?
Kurla Accident : ज्या बसने झाला जीवघेणा अपघात, त्या बसची अवस्था काय ?.