मुंबईच्या भायखळा जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट, सहा दिवसात लहान मुलांसह 39 जणांना संसर्ग

| Updated on: Sep 26, 2021 | 1:39 PM

मुंबईच्या भायखळा तुरुंगात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना पाहायला मिळत आहेत. मागच्या दहा दिवसात ज्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये भायखळा तुरुंगात 120 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

मुंबईच्या भायखळा जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट, सहा दिवसात लहान मुलांसह 39 जणांना संसर्ग
भायखळा जेल
Follow us on

मुंबई: मुंबईच्या भायखळा तुरुंगात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना पाहायला मिळत आहेत. मागच्या दहा दिवसात ज्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये भायखळा तुरुंगात 120 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 39 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या कैद्यांमध्ये 10 महिला आणि 5 लहान मुलांचादेखील समावेश आहे.

कोरोना बाधित कैदी क्वारंटाईन

कोरोना रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याने त्यांना बाजूच्याच एका शाळेत क्वारंटईन करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमधील गर्भवती महिलेला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपर्कात आलेल्यांचीही विशेष काळजी घेतली जात आहे..

मुंबई कोरोना अपडेट

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला

राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईतही शाळा कधी सुरू होणार असा सवाल केला जात आहे. मात्र, मुंबईतील शाळाही आता लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात चर्चा झाली असून शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युलाही ठरला आहे. खुद्द वर्षा गायकवाड यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना शाळा सुरू होण्याबाबतची माहिती दिली. मुंबईतील पालिकेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे. माझी महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. शाळा सुरू करण्याबाबत ते सकारात्मक आहेत, असं गायकवाड यांनी सांगितलं.

फॉर्म्युला काय?

मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं असून सर्वच शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली आहे, असं त्या म्हणाल्या.

इतर बातम्या:

नाशिक जिल्ह्यात 20 टक्के शिक्षक कोरोना लसीविनाच; अन् शाळा होतायत सुरू!

सुई पाहून लस घेण्यास नकार, पण मित्रांनी शक्कल लढवली, नेमकं काय केलं ? व्हिडीओ पाहाच

Maharashtra Corona Update 39 inmates incl 6 children tested COVID positive in last 10 days in Byculla jail Mumbai