AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक जिल्ह्यात 20 टक्के शिक्षक कोरोना लसीविनाच; अन् शाळा होतायत सुरू!

राज्य सरकारने एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 20 टक्के शिक्षकांनी (teachers) अजूनही कोरोना लस घेतलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊन मुलांमध्ये कोरोना (corona) पसरल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल पालकांमधून होत आहे.

नाशिक जिल्ह्यात 20 टक्के शिक्षक कोरोना लसीविनाच; अन् शाळा होतायत सुरू!
कोरोना लसीकरण.
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 2:59 PM
Share

नाशिकः राज्य सरकारने एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 20 टक्के शिक्षकांनी (teachers) अजूनही कोरोना लस घेतलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊन मुलांमध्ये कोरोना (corona) पसरल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल पालकांमधून होत आहे. (20 percent teachers in Nashik district without corona vaccine)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना 5 सप्टेंबरपर्यंत लस घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही अनेक शिक्षकांनी लस घेतली नसल्याचे समजते. अनेकांनी लसीबाबतच्या गैरसमजातून लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. काही जणांनी काहीही कारण नसताना चालढकलपणा केला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे किती शिक्षकांनी लस घेतली याची निश्चित आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा सवाल आता पालक वर्गामधून होत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी काही तरी नियोजन करायला हवे. एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे, वर्गात हवा खेळती असावी, शिक्षकांना कोरोना लसीकरण सक्तीचे करावे. मात्र, यातील एकही पाऊल सरकारने उचलले दिसत नाही.

लसीकरणाची सक्ती करावी

अजून लहान मुलांची लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने कमीत कमी शिक्षकांना सक्तीचे लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे. प्रत्येक शिक्षकाला लसीकरण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करावे. शिवाय त्या प्रमाणपत्राची खात्री अॅपवर पडताळून करावी. अन्यथा ज्या शिक्षकांनी लस घेतली नाही, ते लसीकरणाकडे पाठ फिरवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या 618 शाळा सुरू

नाशिक जिल्ह्यात सध्या 618 माध्यमिक शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये एकूण विद्यार्थी संख्या 1 लाख 7 हजार 285 आहे. मात्र, प्रत्यक्षात 62 हजारांच्या जवळपास विद्यार्थीत शाळेत येत आहेत. अनेक पालक अजूनही कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. सरकारने यापूर्वी ज्या शाळा सुरू केले तिथे सॅनिटायझेशन आणि प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यासाठी निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे या शाळांमध्ये ना सॅनिटायझेशन होते, ना कसली प्रतिबंधात्मक उपाययोजना.

नियमांचे पालन नाही

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांकडे पाठ फिरवली आहे. जुन्या नाशिकमधील पंचवटी, रामकुंड परिसरात बाजार असो, की इतर ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. शालिमार, अशोकस्तंभ, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह संपूर्ण शहरातही हीच परिस्थिती आहे. विशेषतः अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. (20 percent teachers in Nashik district without corona vaccine)

इतर बातम्याः

भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना

बांधकाम मजुरांना मोफत ‘मध्यान्ह भोजन’; नाशिकमधून सुरुवात, सकस आहार मिळणार

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.