Maharashtra Corona Update : कोरोनाचा विस्फोट! राज्यात तब्बल 43 हजार 183 नवे रुग्ण, 249 जणांचा मृत्यू

| Updated on: Apr 01, 2021 | 9:53 PM

गेल्या 24 तासांत तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झालाय.

Maharashtra Corona Update : कोरोनाचा विस्फोट! राज्यात तब्बल 43 हजार 183 नवे रुग्ण, 249 जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

मुंबई : राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या 24 तासांत तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहिली तर थोडासा दिलासा मिळतोय. कारण, 32 हजार 641 जण आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 3 लाख 66 हजार 533 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले आहे.(43 thousand 183 new corona patients died in one day on Thursday, 249 people died in Maharashtra)

आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2 कोटी 85 लाख 6 हजार 163 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 कोटी 43 लाख 3 हजार 368 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 54 हजार 898 वर जाऊन पोहोचला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 14 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या 55 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी 49 दिवसांवर आला आहे. 25 मार्च ते 31 मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो 1.38 टक्क्यांवर पोहोचला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 2 हजार 77 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 14 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 35 हजार 849 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 825 रुग्णांची स्थिती चिंतानजक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीय.

आजच्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 27 लाख 3 हजार 446 झाली आहे. त्यातील 23 लाख 22 हजार 60 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 337 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरात आज 3 हजार 630 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 928 जणांनी कोरोनावर मात केलीय. नागपुरातील मृत्यूचा आकडा अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. आज नागपुरात तब्बल 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख 9 हजार 668 झाली आहे. त्यातील 18 लाख 4 हजार 537 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर आतापर्यंत एकूण 5 हजार 158 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिकमधील कोरोना स्थिती –

नाशिकमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नाशिकमध्ये आज दिवसभरात 3 हजार 784 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत 2 हजार 262, नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 335, मालेगाव महापालिका हद्दीत 136 तर जिल्हा बाहेरिल 51 रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : आणखी एका जिल्ह्यात दिवसा संचारबंदी, महाराष्ट्राची दुसऱ्या लॉकडाऊनकडे वाटचाल

मुंबईसह राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा!, रक्तदान करा, सरकारचं आवाहन

43 thousand 183 new corona patients died in one day on Thursday, 249 people died in Maharashtra