AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story : ठाण्यापासून गडचिरोलीपर्यंत… कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर? तुमचा तालुका आहे का? घ्या जाणून A टू Z

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. ठाण्यापासून गडचिरोलीपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

Special Story : ठाण्यापासून गडचिरोलीपर्यंत... कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर? तुमचा तालुका आहे का? घ्या जाणून A टू Z
cm devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 12:50 PM
Share

दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना अखेर गणपती बाप्पा पावला आहे. राज्य सरकारने शब्द दिल्याप्रमाणे आज राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर एक लागू झालेल्या या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंचनामे होण्याच्या आधीच हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 75 टक्के दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा जाहीर झाला आहे.

कोणत्या कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ…

राज्य सरकारने विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने विभाग निहाय दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे.

>> ठाणे विभाग –

रायगड जिल्हा : श्रीवर्धन

रत्नागिरी जिल्हा : रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर

सिंधुदुर्ग जिल्हा : सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला

>> नाशिक विभाग –

नाशिक जिल्हा : मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला आणि देवळा

धुळे जिल्हा : धुळे, साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर

जळगाव जिल्हा : एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल

नंदूरबार जिल्हा : अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा आणि अक्राणी

अहिल्यानगर जिल्हा : नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि रहाता

>> पुणे विभाग-

पुणे जिल्हा : भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर

सोलापूर जिल्हा : उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा

सांगली जिल्हा : मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहाकाळ

सातारा जिल्हा : सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर

कोल्हापूर जिल्हा : पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि चंदडगड.

>> छत्रपती संभाजीनगर विभाग –

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री

जालना जिल्हा : बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफ्राबाद

बीड जिल्हा : बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी

लातूर जिल्हा : लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ, देवणी, जळकोट

धाराशिव जिल्हा : धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा

नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव

परभणी जिल्हा : पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी

हिंगोली जिल्हा : हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत

>> अमरावती विभाग –

बुलढाणा जिल्हा : जळगावजामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलढाणा, शिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदूरा

अमरावती जिल्हा : अमरावती, भातुकली. चांदूर रेल्वे, नांदगाव खं, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदार, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार आणि दर्यापूर.

अकोला जिल्हा : अकोट. अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तीजापूर, बाळापूर बार्शीटाकळी

वाशिम जिल्हा : वाशीम रिसोड, मालेगाव. मंगळुरपीर, कारंजा, मानोरा

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव

वर्धा जिल्हा : वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी

नागपूर जिल्हा : नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड आणि नागपूर शहर

भंडारा जिल्हा : भंडारा, पवनी, लाखांदूर

गोंदिया जिल्हा : तिरोडा

चंद्रपूर जिल्हा : चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजूरा कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही आणि पोंभुर्णा

गडचिरोली जिल्हा : गडचिरोली आणि मोर्शी

कोणत्या विभागात किती तालुके-

ठाणे विभाग – 12

नाशिक विभाग – 49

पुणे विभाग – 35

छत्रपती संभाजीनगर विभाग – 74

अमरावती विभाग – 56

नागपूर विभाग – 39

एकूण – 265

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार