महाराष्ट्राच्या राज्यपालांनी स्वीकारली BAPS ची आशीर्वादाची राखी

आज रक्षा बंधनाचा पवित्र दिवस आहे. BAPS मुंबई स्वामीनारायण मंदिराचे तीर्थस्वरूप स्वामींनी महाराष्ट्राच्या सन्मानीय राज्यपालांना राखी बांधली.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी स्वीकारली BAPS ची आशीर्वादाची राखी
Blessed Rakhi from BAPS
| Updated on: Aug 28, 2026 | 8:07 PM

आज रक्षा बंधनाचा पवित्र दिवस आहे. BAPS मुंबई स्वामीनारायण मंदिराचे तीर्थस्वरूप स्वामींनी महाराष्ट्राच्या सन्मानीय राज्यपालांना राखी बांधली. तीर्थस्वरूप स्वामींनी महंत स्वामी महाराजांच्यावतीने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या मनगटावर पवित्र राखी बांधली. स्वामीश्रींचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. या संवादादरम्यान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी BAPS च्या अध्यात्मिक आणि मानवतावादी उपक्रमांचं कौतुक केलं. समाजाला BAPS कडून जी सेवा दिली जाते, त्या बद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी स्वामीनारायण मंदिराचं कौतुक केलं. जिष्णू देव वर्मा यांनी आनंदाने आशीर्वाद स्वीकारले व महंत स्वामी महाराजांना शुभेच्छा दिल्या.

 

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us