Maharashtra Heatwave : वातावरणब बदललं… महाराष्ट्रात उष्णतेची भयंकर लाट येणार, या तारखेपर्यंत… हवामान खात्याचा मोठा इशारा

महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा आहे. मुंबई, विदर्भ, कोकणात 12 ऑक्टोबरपर्यंत तापमान वाढेल, असा अंदाज आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 37-40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. 'ऑक्टोबर हिट'मुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Heatwave : वातावरणब बदललं... महाराष्ट्रात उष्णतेची भयंकर लाट येणार, या तारखेपर्यंत... हवामान खात्याचा मोठा इशारा
Maharashtra heatwave
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 9:44 AM

पावसाळा संपताच आता संपूर्ण देशातील वातावरण बदललं आहे. हवामानात अचानक बदल झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. प्रचंड उकाड्याने राज्यातील नागरिकांची लाही लाही झाली. त्यातच आता आयएमडीने मोठा इशारा दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 12 ऑक्टोबर पर्यंत उष्णतेची लाट येणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. उष्म्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन राज्यातील नागरिकांना करण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यातही उष्णतेची लाट येणार आहे. उत्तर कोकण जिल्ह्यात काही ठिकाणी उकाडा आणि दमट वातावरण राहणार आहे. येत्या 48 तासात महाराष्ट्रात काही भागातील तापमानात 2-3 डिग्री सेल्सिअसने आणि त्यानंतर 1-3 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील तापमान 37-39 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

Loading...

ऑक्टोबर हिटने विदर्भ तापला

विदर्भातही प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. आतापासूनच संपूर्ण विदर्भात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत आहेत. विदर्भातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भात तापमान 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहचलं आहे. नागपुरात 36 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर इतर जिल्ह्यात सुद्धा तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमानसोबतच उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

ऑक्टोबरमध्येच उन्हाचे चटके आणि उकाडा जाणवत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर नागपूर शहरात ऑक्टोबर हिटचा तडाखा बसला आहे. नागपुरातील तापमान गेल्या काही दिवसांपासून 35 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढील काही दिवस उकाडा असाच कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मुंबईत उकाडा

मुंबईत पावसाळा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उष्णतेचा पारा वाढला आहे. गुरुवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सामान्यपेक्षा तब्बल 4.5 अंशांनी अधिक असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही भागांसाठी भारतीय हवामान विभागाने आज देखीलउष्णतेचा इशारा दिला आहे. मुंबईत 3 ऑक्टोबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर तापमानात मोठी वाढ झाली आहे.

सांताक्रूझ येथे ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 17 ऑक्टोबर 2015 रोजी 38.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. तर कुलाबा येथे 22 ऑक्टोबर 1968 रोजी 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us