AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस्त्यापासून लग्नापर्यंत… उद्या घराबाहेर पडताना थोडं सबूर; मेगाब्लॉक कुठे कुठे? जाणून घ्या

रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मोठा मेगाब्लॉक असणार आहे. कामांसाठी किंवा प्रवासासाठी घराबाहेर पडणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करताना सतर्क राहावे. विविध मार्गांवर सकाळी ३.५५ ते दुपारी ४.४० पर्यंत ब्लॉक असल्याने प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो. रेल्वेचे अद्ययावित वेळापत्रक पाहूनच प्रवासाला निघा.

बस्त्यापासून लग्नापर्यंत... उद्या घराबाहेर पडताना थोडं सबूर; मेगाब्लॉक कुठे कुठे? जाणून घ्या
mumbai mega blockImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 8:19 AM
Share

रविवार म्हटलं तर प्रत्येकजण काही ना काही महत्त्वाची कामे काढत असतो. या कामांसाठी कुटुंबासह लोक घरी पडतात. कुणाचा बस्ता असतो, कुणाचा साखरपुडा, कुणाचं लग्न, तर कुणाच्या जलदानविधीच्या कार्यक्रमासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. तर काही लोक खरेदीसाठीही घराबाहेर पडतात. काही लोक नातेवाईकांना भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडतात. तर काही लोक निव्वळ फिरायला जायचं म्हणून बाहेर पडतात. पण उद्या रविवारी घराबाहेर पडताना थोडं सबूरीनं घ्या. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मोठा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉकचा टाइम टेबल पाहूनच बाहेर पडा. नाही तर मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

तांत्रिक कामांसाठी पश्चिम रेल्वेतर्फे आज शनिवारी रात्री आणि रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम-मुंबई सेट्रल जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. तर, मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे मेगाब्लॉक असणार आहे.

कुठे कसा मेगाब्लॉक…

पश्चिम रेल्वे –

कुठे : माहीम-मुंबई सेंट्रल, जलद अप-डाऊन मार्ग

कधी : मध्यरात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल अंधेरी, सांताक्रूझ ते चर्चगेट स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर धावतील.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग) –

कुठे : माटुंगा-मुलुंड, अप-डाऊन धिमा मार्ग

कधी : सकाळी ३.५५ ते ११.०५ पर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या लोकल माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे –

कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे, अप-डाऊन मार्ग

कधीः सकाळी ११. १० ते दुपारी ४.४० पर्यंत

परिणाम : सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडील सेवा बंद असेल. यावेळी पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालविण्यात येईल.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...