नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर

नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर

नवी मुंबई : राज्य अनलॉक होत असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. अशात नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईत आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. 11 ठिकाणी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra lockdown in navi mumbai from today till 31 October corona update)

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 ऑक्टोबर 2020 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत 11 कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर केलेल्या नागरिकांसाठी नियमही कठोर करण्यात आले आहेत. यामुळे अनलॉकमध्ये शिथील करण्यात आलेले नियमही आता पुन्हा कठोर करण्यात आले आहेत.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कंटेनमेंट झोनची यादी आणि निर्बंध जाहीर केले आहेत. आदेशात दिलेल्या माहितीनुसार, शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था तसंच कोचिंग इन्स्टिट्यूट 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. यासोबतच सिनेमागृह, तरणतलाव, मनोरंजन उद्याने, थिएटर्स, ऑडिटोरिअम इत्यादी स्थळे बंद राहतील. मेट्रो सेवादेखील बंद असणार आहे. केंद्रीय गृह विभागाच्या मान्यतेखेरीज आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीवरही बंदी असेल.

सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमास परवानगी नाही. सर्व अत्यावश्यक वस्तूची दुकाने यापूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहतील. यापूर्वीच्या आदेशाने वेळोवेळी देण्यात आलेल्या बाबी सुरू राहतील. (Maharashtra lockdown in navi mumbai from today till 31 October corona update)

कंटेनमेंट झोनची यादी – बेलापूर – त्रिमूर्ती सदन दारावे गाव, विशाल प्राईड सेक्टर 50 नेरुळ – दिपसागर सोसायटी सेक्टर 19, 20, शिवशक्ती अपार्टमेंट सेक्टर 7 ते 10 वाशी – लाईन शिवथर टॉवर सेक्टर 31, सेक्टर 28 तुर्भे – महावीर अमृत सोसायटी सेक्टर 19, निवारा सोसायटी सेक्टर 3 ऐरोली – ओमकार सोसायटी सेक्टर 10, दिघा – दत्तकृपा अपार्टमेंट

काय राहणार सुरू ?  – हॉटेल, फुडफोर्ट, रेस्टॉरंट आणि बार हे 05/10/2020 पासून 50% क्षमतेने सुरू राहतील – सर्व औद्योगिक आणि उत्पादक युनिट्समध्ये अत्यावश्यक वस्तूंसह इतर वस्तूचे उत्पादन करण्यास परवानगी – ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना संपूर्ण राज्य व राज्याबाहेर पूर्णवेळ वाहतूक करण्याची परवानगी – या व्यतिरिक्त विशिष्ट आदेशाद्वारे संबंधित प्राधिकरणांनानी परवानगी दिलेली कामं करता येतील (Maharashtra lockdown in navi mumbai from today till 31 October corona update)

दरम्यान, कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लोकांनी संचार तसंच प्रवास करु नये यासाठी कठोरपणे नियमाची अंमलबाजावणी करावी असं सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या – 

संभाजीराजे पाठिंबा द्या, बारा हत्तींचं बळ मिळेल, गोपीचंद पडळकरांचं पत्र

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

(Maharashtra lockdown in navi mumbai from today till 31 October corona update)

Published On - 12:17 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI