“मविआतील पक्षांनी आपआपल्या मित्रपक्षांना सांभाळावं”; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानं आगामी निवडणुकांचे सूतोवाच केलं

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका शरद पवार सांगणार आहेतच मात्र आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची आमची मानसिकता झाली आहे.

मविआतील पक्षांनी आपआपल्या मित्रपक्षांना सांभाळावं; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानं आगामी निवडणुकांचे सूतोवाच केलं
| Updated on: Jan 24, 2023 | 5:33 PM

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसची आज वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा करताना भविष्यात महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना सांगतले की, महाविकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत. त्या त्या प्रमुख पक्षांनी आपल्या मित्र पक्षाला सांभाळणे गरजेचे आहे.

जागा वाटपाबाबत आपल्या मित्रपक्षासाठी आपण जागा किती देणार आणि कोणती जागा लढविली जाणार याबाबत ज्या त्या पक्ष प्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका शरद पवार सांगणार आहेतच मात्र आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची आमची मानसिकता झाली आहे.

त्यामुळे आम्ही आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार असल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतीलच एक पक्ष असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसची आमची भूमिका पक्षप्रमुख म्हणून शरद पवार हेच निर्णय घेणार आहेत. त्याच प्रमाणे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते आगामी निवडणुकीबाबत तेच भूमिका घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अजित पवार यांनी आजच्या झालेल्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी आपला पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेसकडून आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकांविषयी लवकरच आमची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस,ठाकरे गट आणि काँग्रेसही एकत्रच निवडणुका लढतील मात्र कोणत्या निवडणुका लढवणार याबाबत अजून स्पष्ट झाले नाही.