AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Shortage Mumbai : मुंबईत आज गॅस सिलिंडरसाठी कुठे रांगा लागल्यात? कुठे काळाबाजार सुरु आहे? जाणून घ्या स्थिती

LPG Shortage Mumbai : मध्य पूर्वेतील युद्धाचे आता मुंबईत परिणाम जाणवू लागले आहेत. बुक करुनही लोकांना गॅस सिलिंडर मिळत नाहीय. मुंबईत आज काय स्थिती आहे? जाणून घ्या.

LPG Shortage Mumbai : मुंबईत आज गॅस सिलिंडरसाठी कुठे रांगा लागल्यात? कुठे काळाबाजार सुरु आहे? जाणून घ्या स्थिती
LPG Shortage Mumbai Update
| Updated on: Mar 14, 2026 | 11:46 AM
Share

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे सर्वसामान्यांसमोर LPG गॅस सिलिंडरचं संकट निर्माण झालं आहे. केंद्र सरकारकडून चिंता करु नका असं सांगण्यात येतय. पण वास्तवात चित्रं वेगळं आहे. बुक केल्यानंतरही सिलिंडर घरपोच वेळेवर मिळत नाहीय. त्यामुळे गॅस वितरकांच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणा सिलिंडरचा काळबाजार सुरु आहे. मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कुठे काय स्थिती आहे? ते आमच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घ्या. वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड झाला आहे. शिधावाटप विभागाने मोठी कारवाई केली. निमेश जैनवर गुन्हा दाखल केला. टेम्पो मालक फरार झाला आहे. मुंबईच्या वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा शिधावाटप विभागाने पर्दाफाश केला आहे. वरळी नाका येथील ‘सूरजी वल्लभदास चाळ’ परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.

“चर्चगेट येथील प्रधान कार्यालयाला या संदर्भात माहिती मिळाली होती. त्या खात्रीलायक माहितीनुसार प्रधान कार्यालयाचे अधिकारी तिथे उपस्थित झाले. मी आणि माझे सहाय्यक अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचलो आणि तिथे आम्हाला सुरजी वल्लभदास चाळ वरळी नाका येथे त्या चाळीच्या मागच्या बाजूला अवैध रित्या गॅस सिलेंडर आढळून आले. बऱ्याच मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. त्यावेळी तिथे एक इसम उपस्थित होता त्या टेम्पो जवळ. तो इसम आणि टेम्पोचा मालक या दोघांवरही आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. अंदाजे त्या साठ्याची किंमत 5 लाख 66 हजार इतकी आहे. अंदाजे 80 च्या वर भरलेले सिलेंडर होते आणि त्यापेक्षा जास्त रिकामी सिलेंडर होते” अशी माहिती माधवी जोशी यांनी दिली. त्या सहाय्यक शिधा वाटप अधिकारी आहेत.

खाऊ गल्लीत काय स्थिती?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर खाऊ गल्लीत खवय्यांचे प्रचंड हाल सुरु आहेत. दुकानदारांकडे कमर्शियल गॅसचा पुरवठाच नसल्याने अखेर त्यांच्यावर इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. सरकार मुर्ख बनवतेय, आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीये. अशी खंत दुकानदार व्यक्त करत आहेत. गॅस नाही त्यामुळे गावी जातोय अशीही प्रतिक्रिया दुकानदार देत आहेत.

फोर्ट परिसरात चुली पेटवल्या

मुंबईतील फोर्ट परिसरात छोट्या दुकानदारांनी चूल पेटवली आहे. फोर्ट परिसरात 90 टक्के हॉटेल्स आणि टपरी चालकांकडे गॅसचा पुरवठा बंद आहे. अनेकांनी कोळश्याच्या शेगडीवर व्यवसाय सुरु ठेवलाय. जेवणाचे हाल झाले, गॅस नाही त्यामुळे ऊपासमारीची वेळ आली अशी दुकानदारांची प्रतिक्रिया.

कांदिवलीत काय स्थिती?

आजही कांदिवलीतील चारकोपमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी लोकांची मोठी गर्दी जमली आहे. लोक सकाळपासून सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत आणि गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहत आहेत. सर्व पुरुष आणि महिला सकाळपासून गॅस सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत.कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईत कुठे कोळशाची मागणी वाढली?

मुंबईतील शिवडीत सध्या कोळसा ऊत्पादकांची डोकेदुखी वाढलीये. हॉटेलला गॅस पुरवठा बंद झाल्याने आत्ता लाकडी कोळश्याची मागणी वाढलीये. रोज 10 ट्रक भरून कोळसा मुंबईतील विविध भागात रवाना होतोय. केवळ 10 दिवस पुरेल इतकाच कोळश्याचा साठा उपलब्ध आहे. सध्या कोळसा होलसेल व्यापार करणाऱ्यांकडे उपलब्ध आहे. जर १० दिवसांत गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोळश्याच्या विक्रीत प्रत्येक किलोमागे पाच रुपयांची वाढ झालीये.

Follow Us
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी
परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!