AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: ‘या’ वेळेत बूक करा सिलेंडर… नाही येणार अडचणी… सोपी आहे ट्रिक

LPG Cylinder: इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. अनेकांना तर सिलेंडर बूक करताना देखील अनेक अडचणी येत आहे. अशात जाणून घ्या सिलेंडर बूक करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे.

LPG Cylinder: 'या' वेळेत बूक करा सिलेंडर... नाही येणार अडचणी... सोपी आहे ट्रिक
| Updated on: Mar 14, 2026 | 11:45 AM
Share

LPG Booking Time: मध्यपूर्वेतील युद्धाचे पडसाद आता भारतात देखील दिसून येत आहेत. देशात LPG सिलेंडरचा तुडवडा असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अचानक सिलेंडर बूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर सिलेंडर बूक करण्यासाठी देखील अनेक अडचणी येत आहेत. गॅस कंपन्यांच्या सर्व्हरवर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बुकिंग सिस्टीमवर ताण वाढला आहे. कंपन्यांनी लोकांना घाबरून जाऊन वारंवार सिलेंडर बुकिंग करण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तुमच्याकडून देखील सिलेंडर बूक होत नसेल तर, एलपीजी सिलिंडर बुक करण्याची सर्वोत्तम वेळ जाणून घेऊया. जर तुम्ही योग्य वेळेत सिलेंडर बूक केला तर, तुम्हाला उत्तम सेवा मिळू शकते… एवढंच नाही तर, सरकारने देखील स्पष्ट केलं आहे की, LPG गॅसचा पुरवठा सामान्य आणि कोणत्याच प्रकारची कमतरता भासणार नाही.

LPG सिलेंडर बूक करण्यासाठी योग्य वेळ…

अनेक माध्यमांच्या रिपोर्टनुसार, एलपीजी सिलेंडर बुक करण्याचा सर्वोत्तम वेळ संध्याकाळी 6 नंतरचा आहे. यावेळी सर्व्हरवर दबाव कमी असतो, ज्यामुळे बुकिंग करणे सोपे होते. आजकाल, बुकिंग प्लॅटफॉर्मवर नेहमीपेक्षा 8 ते 10 टक्के अधिक ट्रॅफिक असल्याचं चित्र दिसत आहे. बरेच लोक घाबरून वारंवार बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे सिस्टमवर आणखी भार पडत आहे.

रात्री करण्यात आलेली बुकींग कधी प्रोसेस होईल…

जर तुम्ही रात्री 10 वा. पासून सकाळी 6 वा. दरम्यान बुकींग केली, तर तुमची बुकींग सकाळी 6 नंतर प्रोसेस होईल… सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांचं e-KYC पूर्ण झालेलं असणं प्रचंड गरजेचं आहे.. जर e-KYC पूर्ण झालेली नसेल तर, डिस्ट्रिब्यूटर सिलेंडरची डिलिव्हरी थांबवू शकतात…

गॅस कनेक्शनशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर बुकिंग आणि डिलिव्हरीचे मेसेज पाठवले जातात, त्यामुळे ग्राहकांनी त्यांचा नोंदणीकृत नंबर सक्रिय ठेवावा. ग्राहक WhatsApp च्या माध्यमातून देखील LPG सिलेंडर बूक करु शकतात. WhatsApp च्या मदतीने सिलेंडर बूक करायचा असल्यास, WhatsApp च्या 7588888224 या क्रमांकावर “REFILL” असं मेसेज पाठवा.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गॅस कंपन्यांच्या नियमांनुसार, ग्राहक मागील सिलेंडरच्या डिलिव्हरीच्या 25 दिवसांच्या आत नवीन सिलेंडर बुक करू शकत नाहीत. हा नियम अनावश्यक आणि पॅनिक बुकिंग टाळण्यासाठी बनवण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीवर DAC म्हणजे Delivery Authentication Code आवश्यक आहे. हा ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी-आधारित सुरक्षा कोड आहे. डिलिव्हरीवर हा कोड दिल्यानंतरच सिलेंडरची डिलिव्हरी केली जाईल.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं