“आगामी काळात महाविकास आघाडी ताकदीने लढणार”; लोकसभा निवडणुकीवर ‘या’ नेत्याने मविआची भक्कम बाजू सांगितली

| Updated on: May 29, 2023 | 10:35 PM

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असं वृत्त आले आहे. त्यामुळे जरी या निवडणुका एकत्र आल्या तरी त्या आम्ही जोमाने लढणार असल्याचे सांगत निवडणुका एकत्र आल्या तरी काही हरकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात महाविकास आघाडी ताकदीने लढणार; लोकसभा निवडणुकीवर या नेत्याने मविआची भक्कम बाजू सांगितली
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकावरून राज्यातील वातावरण तापले आहे. पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली आहे. पुण्याच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेच्या जागांविषयी बोलताना सांगितले की, पक्षाचे वरिष्ठ नेते लोकसभेच्या जागांविषयी विचार करून निर्णय घेतील मात्र आगामी काळातील होणाऱ्या निवडणुका या महाविकास आघाडीकडून एकत्रच लढल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे की, आता प्रत्येक पक्ष आपापल्या जागा तपासून बघत असून काँग्रेसकडूनही त्यांच्या 48 जागांची चाचपणी करुन पाहण्यात आहे.

त्यामुळे सध्या कुठल्या पक्षाचा बळ किती आहे हे कळेल त्याच बरोबर जो पक्ष आपापल्या जागांवर दावा करत याहे, त्या जागांबाबत पक्ष विचार विनिमय करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडी आणि आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा त्यांनी संदर्भ देत सांगितले की, अजित पवार यांनी सांगितलं होतं की, महाविकास आघाडी आगामी काळातील निवडणुका ताकदीने लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे लोकसभेच्या जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणतेही वाद नसून चाचपणी केल्यानंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते जागावाटप करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असं वृत्त आले आहे. त्यामुळे जरी या निवडणुका एकत्र आल्या तरी त्या आम्ही जोमाने लढणार असल्याचे सांगत निवडणुका एकत्र आल्या तरी काही हरकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत खैरे यांनी यावेळी किरीट सोमय्यांवर यांच्यावही जोरदार हल्लाबोल केला आहे. तर त्याच वेळी त्यांनी त्यांनी नारायण राणे यांच्या पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, नितेश राणे यांच्यामुळे आता भाजप बदनाम होत आहे. त्यामुळे त्याचा फटका त्यांच्या पक्षाला बसत असून नितेश राणे हा फक्त बडबड करत असतो अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.