भुलेश्वर येथे गणपती मूर्तीला आणताना मोठा अपघात, दोन जण ठार, पाच जखमी..

भुलेश्वरच्या गणपतीची २२ फूट उंच मूर्ती तोल गेल्याने कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.गणेशमूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला नेण्यात येत होती.

भुलेश्वर येथे गणपती मूर्तीला आणताना मोठा अपघात, दोन जण ठार, पाच जखमी..
Bhuleshwarcha Raja shocking incident
| Updated on: Aug 23, 2026 | 6:40 AM

भुलेश्वरच्या गणपतीची २२ फूट उंच मूर्ती तोल गेल्याने कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेशमूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला नेण्यात येत असताना रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.  ‘भुलेश्वरचा राजा’ या २२ फूट उंच गणपतीची मूर्ती भायखळ्याहून भुलेश्वरकडे नेली जात असताना ती अचानक कोसळली. विशेष म्हणजे मंडपापासून अवघ्या  ५०-६० मीटर अंतरावर हा प्रकार घडला.

भुलेश्वर येथील भुलेश्वरच्या महाराजाला आणताना मोठी दुर्घटना घडली आहे. या २२ फूटांच्या भव्य मूर्तीला भायखळा ते भुलेश्वर येथे नेताना ही मूर्ती एका बाजूला कलंडल्याने पाच जण जखमी झाले तर त्यातील दोघांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ही घटना मंडपाच्या अवघ्या ५०-६० मीटर आधी घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे दिसत नसून प्राथमिक तपासानुसार, तोल गेल्यामुळे ही घटना घडली असावी असे म्हटले जात आहे.

Loading...

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या गणेश मूर्तींसह सहा फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचे कृत्रीम जलाशयांमध्ये विसर्जन करावे आणि सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींचे नैसर्गिक जलाशयांमध्ये विसर्जन करावे असे आदेश या वर्षी देखील लागू करण्यात आले आहेत. मुंबईतील गणेश मूर्तीच्या उंचीमुळे अनेकदा अपघात घडले आहेत. यंदा कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. मात्र, या प्रकरणात जास्ती जास्त शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या सूचना आहे. परंतू मुंबईत एक अपवाद म्हणून उंच मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. या मूर्तींना समुद्रात विसर्जन करतानाही खास तराफा सोबत न्यावा लागतो.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us