दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारील पार्किंगला मोठी आग,१५ हून अधिक दुचाकी जळून खाक

गर्दीच्या दादर स्थानकात पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांना मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारील पार्किंगला मोठी आग,१५ हून अधिक दुचाकी जळून खाक
dadar station fire
| Updated on: Sep 03, 2025 | 10:33 PM

गजबलेल्या दादर स्थानकाच्या शेजारी असलेल्या दुचाकी पार्किंगच्या वाहनांना अचानक आग लागल्याने बुधवारी रात्री घबराट पसरली. या आगीमुळे स्थानकातील यंत्रणा लागलीच अलर्ट झाल्या. या आगीत पंधराहून अधिक वाहने जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. या आगीवर स्थानिक अधिकाऱ्यांनी अग्निशमन उपकरणे वापरुन नियंत्रण मिळवले.

दादर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाकींना भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे लोळ उठताना दूरपर्यंत दिसल्याने स्थानकातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या आगीच्या भडक्याने पंधरा वाहने जळून खाक झाली आहे. घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतू अधिकाऱ्यांनी अग्निशमन उपकरण वापरुन या आगीवर नियंत्रण मिळवले.

येथे पोस्ट पाहा –

आगीचे कारण कळले नाही

दादर स्थानकाला लागून असलेल्या दुचाकी पार्किंगला अचानक आग लागल्याने वाहनांनी पटापट पेट घेतला. ही आग विझवण्याआधीच पंधराहून अधिक वाहने जळून खाक झाल्याचे समजते. या वाहनांच्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या ठिकाणी पोलिस पोहचले असून ते या ठिकाणी तपास करीत आहेत. दादर टर्मिनसच्या फलाट क्रमांक १४ शेजारील भिंती पलिकडील दुचाकींना ही आग लागल्याचे म्हटले जात आहे. या आगीच्यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतूकीला कोणताही अडथळा आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने कोणतीही गंभीर घटना घडली नाही.