कबुतरखान्याचा वाद चिघळला, मराठी एकीकरण समितीचे दादरमध्ये आंदोलन, कार्यकर्त्यांची धरपकड

मराठी एकीकरण समितीने दादरच्या कबुतरखाना बंदीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. जैन मुनींच्या शस्त्र उचलण्याच्या वक्तव्यांनंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. समितीने कोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे

कबुतरखान्याचा वाद चिघळला, मराठी एकीकरण समितीचे दादरमध्ये आंदोलन, कार्यकर्त्यांची धरपकड
| Updated on: Aug 13, 2025 | 12:15 PM

मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं कबुतरखाना परिसरात आंदोलन केले जात आहे. सध्या दादरच्या कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांना ताब्यात घेतल्याने कबुतरखान्याचा वाद चिघळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी मराठी एकीकरण समितीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कबुतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही. कबुतरखाना बंदीचा हा विषय सामाजिक आहे. त्यामुळे कबुतरखआना बंदीला जातीयवादाचा रंग देऊ नका. त्या दिवशी जैन समाजाने जे आंदोलन केले, त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच मराठी एकीकरण समितीने कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा, असे आवाहनही यावेळी केले.

आंदोलकांची धरपकड सुरु

सध्या दादरच्या कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचे अनेक आंदोलक जमले आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच नोटीसा बजावल्या आहेत. यावेळी अनेक आंदोलक हे डोक्यावर टोपी घालून जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तसेच काही जणांना ताब्यातही घेतले जात आहे. सध्या कबुतरखान्याला छावणीचे स्वरुप आले आहे. या परिसरातील आजूबाजूच्या सोसायटीमधील लोकही या आंदोलना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे. सध्या या परिसरातील लोकही या आंदोलनात उतरताना दिसत आहेत. त्यामुळे दादरच्या कबुतरखाना परिसरात मोठं आंदोलन सुरु असून सध्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.

आणीबाणीचा काळ आणू नये

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोवर्धन देशमुख हे इथे पोहोचल्यानंतर लगेचच त्यांना पोलिसांनी घेराव घातला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गोवर्धन देशमुख यांनी “पोलिसांनी आम्हाला आमची भूमिका मांडू द्यावी, आम्ही फक्त आमचे म्हणणं मांडायला आलो आहोत. आम्ही फक्त पोलिसांना निवदेन देण्यासाठी आलो आहोत, असे गोवर्धन देशमुख म्हणाले. यावेळी गोवर्धन देशमुख यांनी पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. त्यांनी ही दडपशाही थांबवावी, तसेच आणीबाणीचा काळ आणू नये”, असेही गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.

जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद

दरम्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतर खाना परिसरातील दुकान दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.