Mumbai SRA Building Fire : अंधेरीमध्ये एसआरए बिल्डिंगला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांच्या इमारतीवरून उड्या, मोठा आक्रोश

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात असलेल्या एसआरए बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला.

Mumbai SRA Building Fire : अंधेरीमध्ये एसआरए बिल्डिंगला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांच्या इमारतीवरून उड्या, मोठा आक्रोश
Mumbai SRA Building Fire
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 03, 2026 | 6:32 PM

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात असलेल्या एसआरए बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून, जीव वाचवण्यासाठी इमारतीत अडकलेल्या नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. काही नागरिकांनी तर जीव वाचवण्यासाठी थेट इमारतीवरून उड्या मारल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. नूर मशीद आणि खोजा जमातखाना जवळील युनायटेड सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदल तातडीने घटनास्थळी दाखल झालं असून,  सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात असलेल्या एसआरए बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एसआरए बिल्डिंग नंबर दोनला ही आग लागली होती. नूर मशीद आणि खोजा जमातखाना जवळील युनायटेड सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान इमारतीला आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, धावपळ सुरू झाली. नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. समोर आलेल्या माहितीनुसार काही नागरिकांनी तर आपला जीव वाचवण्यासाठी थेट इमारतीवरून खाली उड्या देखील मारल्या.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, बचाव कार्य सुरू केलं. अग्निशमन दलाने या इमारतीमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. त्यानंतर काही वेळाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी हजर आहेत. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, आगीच्या कारणांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

या आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु किती नुकसान झालं आहे, याचा तपास आता सुरू आहे. तसेच आगीच्या कारणांचा देखील शोध घेतला जात आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

 

 

Follow Us