Farmer Protest : 60 दिवस होऊनही केंद्राने याची दखल घेतलेली नाही : आदित्य ठाकरे

| Updated on: Jan 25, 2021 | 4:32 PM

मात्र 60 दिवस होऊनही केंद्राने याची दखल घेतलेली नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. (Aaditya Thackeray On Farmer Protest)

Farmer Protest : 60 दिवस होऊनही केंद्राने याची दखल घेतलेली नाही : आदित्य ठाकरे
Follow us on

कल्याण : मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची केंद्राने किती दखल घेतली हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेचा या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र 60 दिवस होऊनही केंद्राने याची दखल घेतलेली नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्धाटनानंतर ही प्रतिक्रिया दिली. (Aaditya Thackeray Comment On Mumbai Farmer Protest)

“किसान मोर्चाच्या इथे कोणी फिरकलं नाही. यापेक्षा केंद्राने याची किती दखल घेतली आहे. याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवं. महाविकासआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेतृत्व करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल बोलले आहेत. जेव्हा मोर्चे येतात, तेव्हा मास्क घालणं गरजेचं आहे. कारण कोरोना संपलेला नाही,” असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

“शिवसेनेचा या शेतकऱ्यांच्या मोर्चेला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र 60 दिवस झाले तरी केंद्राने याची दखल घेतलेली नाही, हा प्रश्न आपण विचारायला हवा,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

नावावरुन नेहमीच वाद, काम वेळेत करणं गरजेचं

कल्याण डोंबिवली या पूर्ण परिसरासाठी महत्त्वाचा असलेल्या पत्रीपुलाची वचनपूर्ती झाली आहे. गेल्या दीड वर्षात एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन याचे उद्धाटन झाले आहेत. तसेच सॅटिस येथील भूमीपुजन देखील झाले आहे. तसेच कमान आणि कंट्रोल सेंट्रलचे देखील उद्धाटन होत आहे आणि ते वेळेत केले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

नावावरुन नेहमीच चर्चा होत आहे. त्याच्यावरुन नेहमी वाद सुरु असतात. काम वेळेत करणं गरजेचे असतं, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

‘लाल वादळ’ राजभवनाच्या दिशेने

आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही कान उपटले आहेत. “महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली. (Aaditya Thackeray Comment On Mumbai Farmer Protest)

संबंधित बातम्या : 

‘लाल वादळ’ राजभवानाच्या दिशेने, मोर्चेकऱ्यांना अडवलं; पोलिसांबरोबर आंदोलकांची झटापट

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार