Bihar Bhavan : राज ठाकरे हे महाराष्ट्राचा राजा आहेत का? कस बांधू देणार नाहीत ? बिहार भवनचा विषय पेटणार

Bihar Bhavan : "जर त्यांनी म्हटले असते की पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार आणि मुंबई मध्ये बिहार भवन बांधू, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हटलं असतं. भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा हा उद्योग आहे"

Bihar Bhavan : राज ठाकरे हे महाराष्ट्राचा राजा आहेत का? कस बांधू देणार नाहीत ? बिहार भवनचा विषय पेटणार
Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Jan 24, 2026 | 2:02 PM

“राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का ?. महाराष्ट्रात बिहार भवन कस बांधू देणार नाहीत ? आम्ही कुठल्याही परिस्थितीत बिहार भवन बांधू” असं बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “हे सगळे फालतू आणि घटिया लोक आहेत. हे भवन भावनेतून बनत आहे, अनेक राज्यात बिहार भवन बांधल जात आहे” अशोक चौधरी यांच्या टिकेनंतर नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. “त्यांनी आधी त्यांचं स्वतःच राज्य नीट करावं. त्यांच्या राज्यातील लोकं बाहेर जातात. त्यांना तिथे थांबवावं. त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करावा. म्हणजे त्यांना कळेल आपली लोक बाहेर का जातात?. त्यांच्या राज्याला महाराष्ट्रावर अवलंबुन राहावं लागतं, ते लागणार नाही” असं उत्तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिलं.

राज ठाकरे ते आहेत जे ज्यांनी 35 व्या वर्षी पक्ष काढला. लोकसभेला भाजपने आग्रह केल्यावर पंतप्रधान मोदी यांना पाठींबा देणारे राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंचा त्यांनी गुण घ्यावा. त्यांचं राज्य सुजलाम सुफलाम होईल. बाकीची दिवाळ खोरी करण्यापेक्षा आपलं बघावं” अशी टीका अविनाश अभ्यंकर यांनी केली. “मुंबई मध्ये अनेक लोक येतात त्यांचे बाकी ठिकाणी उपचार होतात. भवन नक्की काय आहे? त्याची माहिती घेतील, त्या नंतर साहेब भूमिका मांडतील” असं अविनाथ अभ्यंकर म्हणाले.

पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार का?

“मुंबई मध्ये बिहार भवन बांधण्याचे कारण काय? हे त्यांनी स्पष्ट करावं. हा निर्णय जर सांस्कृतिक आदान-प्रदानाचा असता तर आपल्याला चांगलं म्हणता आलं असतं. मात्र जातीयवाद निर्माण करण्याच्या अनुषंगाने आणि तोडफोड करण्याच्या अनुषंगाने घेतलेलं निर्णय आहे. जर त्यांनी म्हटले असते की पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार आणि मुंबई मध्ये बिहार भवन बांधू, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हटलं असतं. भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा हा उद्योग आहे” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मनसेनं हार भवन उभे करावे

“बिहार भवनला विरोध करण्याऐवजी हार भवन उभं करा. मनसेनं हार भवन उभे करावे” अशी जिव्हारी लागणारी टीक भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी केली.