AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Bhavan : राज ठाकरे हे महाराष्ट्राचा राजा आहेत का? कस बांधू देणार नाहीत ? बिहार भवनचा विषय पेटणार

Bihar Bhavan : "जर त्यांनी म्हटले असते की पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार आणि मुंबई मध्ये बिहार भवन बांधू, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हटलं असतं. भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा हा उद्योग आहे"

Bihar Bhavan : राज ठाकरे हे महाराष्ट्राचा राजा आहेत का? कस बांधू देणार नाहीत ? बिहार भवनचा विषय पेटणार
Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Jan 24, 2026 | 2:02 PM
Share

“राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का ?. महाराष्ट्रात बिहार भवन कस बांधू देणार नाहीत ? आम्ही कुठल्याही परिस्थितीत बिहार भवन बांधू” असं बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “हे सगळे फालतू आणि घटिया लोक आहेत. हे भवन भावनेतून बनत आहे, अनेक राज्यात बिहार भवन बांधल जात आहे” अशोक चौधरी यांच्या टिकेनंतर नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. “त्यांनी आधी त्यांचं स्वतःच राज्य नीट करावं. त्यांच्या राज्यातील लोकं बाहेर जातात. त्यांना तिथे थांबवावं. त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करावा. म्हणजे त्यांना कळेल आपली लोक बाहेर का जातात?. त्यांच्या राज्याला महाराष्ट्रावर अवलंबुन राहावं लागतं, ते लागणार नाही” असं उत्तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिलं.

“राज ठाकरे ते आहेत जे ज्यांनी 35 व्या वर्षी पक्ष काढला. लोकसभेला भाजपने आग्रह केल्यावर पंतप्रधान मोदी यांना पाठींबा देणारे राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंचा त्यांनी गुण घ्यावा. त्यांचं राज्य सुजलाम सुफलाम होईल. बाकीची दिवाळ खोरी करण्यापेक्षा आपलं बघावं” अशी टीका अविनाश अभ्यंकर यांनी केली. “मुंबई मध्ये अनेक लोक येतात त्यांचे बाकी ठिकाणी उपचार होतात. भवन नक्की काय आहे? त्याची माहिती घेतील, त्या नंतर साहेब भूमिका मांडतील” असं अविनाथ अभ्यंकर म्हणाले.

पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार का?

“मुंबई मध्ये बिहार भवन बांधण्याचे कारण काय? हे त्यांनी स्पष्ट करावं. हा निर्णय जर सांस्कृतिक आदान-प्रदानाचा असता तर आपल्याला चांगलं म्हणता आलं असतं. मात्र जातीयवाद निर्माण करण्याच्या अनुषंगाने आणि तोडफोड करण्याच्या अनुषंगाने घेतलेलं निर्णय आहे. जर त्यांनी म्हटले असते की पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार आणि मुंबई मध्ये बिहार भवन बांधू, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हटलं असतं. भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा हा उद्योग आहे” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मनसेनं हार भवन उभे करावे

“बिहार भवनला विरोध करण्याऐवजी हार भवन उभं करा. मनसेनं हार भवन उभे करावे” अशी जिव्हारी लागणारी टीक भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी केली.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत