AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग भयंकर संकटात! कोणत्याही क्षणी उडू शकतो युद्धाचा भडका, थेट विमान कंपन्यांनी…

इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांकडून सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. जगाच्या या दोन्ही देशांकडे नजरा आहेत. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, ज्याने जगाची झोप उडाली आहे.

जग भयंकर संकटात! कोणत्याही क्षणी उडू शकतो युद्धाचा भडका, थेट विमान कंपन्यांनी...
Iran and America war
| Updated on: Jan 24, 2026 | 2:00 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसत आहे. इराणच्या दिशेने अमेरिकेने एक पाऊस पुढे टाकले. इराणनेही मोठी धमकी देत थेट म्हटले की, यापूर्वी दिलेला त्रास आणि आता जे सुरू आहे, त्या सर्वांना एकत्रच उत्तर दिले जाईल. कोणत्याही क्षणी अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू होऊ शकते. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. यादरम्यान सरकारकडून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला. याला अमेरिकेने विरोध केला असून इराणमधील लोकांचा लढा शेवटच्या टप्प्यात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणत या आंदोलनाला पाठिंबा दिला. इराणने स्पष्ट शब्दात सांगितले की, आमच्या सुरक्षेच्या मुद्द्यात कोणी येत असेल तर हात कापले जातील. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराण सरकार अमेरिकेने दिलेल्या धमक्यांना थेट उत्तर देताना दिसत आहे.

इराणवर कधीही हल्ला होऊ शकतो, याचे मोठे संकेत पुढे येताना दिसत असून विमान कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाने खळबळ उडाली आहे. युरोपमधील प्रमुख विमान कंपन्यांनी खबरदारीचे उपाय करत मोठा निर्णय घेतला आहे. डच एअरलाइन केएलएमने इस्रायल, फ्रेंच एअर फ्रान्स यांनी दुबई आणि सौदी अरेबियाला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. सुरक्षेचे कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला.

यादरम्यान कंपन्यांनी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्याकडे प्रथम असल्याचे सांगत हा निर्णय घेतला. यासोबतच त्यांनी सांगितले की, आमच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. जर्मनीच्या लुफ्थांसा ग्रुपने जानेवारी अखेरपर्यंत इस्रायलला जाणारी रात्रीची उड्डाणे रद्द केली, असतानाच आता हा निर्णय घेण्यात आला आहे

ज्याप्रकारे विमान कंपन्या निर्णय घेत आहेत, त्यावरून हे स्पष्ट होताना दिसत आहे की, कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकते. इराणकडून अगोदरच सांगण्यात आले की, अमेरिकेने आमच्यावर हल्ला करण्याची हिंमत केली तर आम्ही संपूर्ण जगाला नष्ट करू. इराण आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. मात्र, इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशावर टॅरिफ लावला जाईल, अशी धमकी अगोदरच अमेरिकेकडून देण्यात आली.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....