AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलींसाठी आनंदाची बातमी, 100 टक्के फी माफ होणार?

राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागास वर्गातील मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागासातील मुलींसाठीची 100 टक्के फी माफ करावी, अशी शिफारस चंद्रकांत पाटील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आणि आर्थिक मागास घटकातील मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलींसाठी आनंदाची बातमी, 100 टक्के फी माफ होणार?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 17, 2023 | 7:22 PM
Share

विनायक डावरुंग, मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागास वर्गातील मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागासातील मुलींसाठीची 100 टक्के फी माफ करावी, अशी शिफारस चंद्रकांत पाटील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच चंद्रकांत पाटील यांना तसा प्रस्ताव देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील याबाबत शिफारस करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर 642 कोर्सेससाठी 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची तरतूद करावी लागणार असल्याची माहिती समोर आलीय.

परभणी येथे एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतला. या तरुणीने फीसाठी पैसे नसल्यामुळे स्वत:चं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तिने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने “माझी 50 टक्के फी सरकार भरत आहे. त्याबद्दल मी सरकाचे आभार मानते. पण उरलेली 50 टक्के फी भरायला माझ्या पालकांकडे पैसे नाहीत”, असं लिहिलं होतं. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या मनाला चटका लावणारी ठरली. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागासातील मुलींसाठीची 100 टक्के फी माफीचा प्रस्ताव द्यायला सांगितला आहे. हा प्रस्तव लवकरच दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रिमंडळाची बैठक संपन्न

दरम्यान, मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यानी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सरकारकडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून किती हजार कोटींच्या रुपयांची तरतूद करण्यात आलीय, याविषयी सविस्तर विश्लेषण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना