VIDEO: तर विधानसभेत फाशी घेईल, रवी राणाच्या संतापानं सभागृह स्तब्ध, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांविरोधात पुरावे; पेन ड्राईव्ह दाखवला

| Updated on: Mar 07, 2022 | 1:04 PM

अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले.

VIDEO: तर विधानसभेत फाशी घेईल, रवी राणाच्या संतापानं सभागृह स्तब्ध, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांविरोधात पुरावे; पेन ड्राईव्ह दाखवला
तर विधानसभेत फाशी घेईल, रवी राणाच्या संतापानं सभागृह स्तब्ध
Image Credit source: vidhansabha tv
Follow us on

मुंबई: अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा (ravi rana) यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे आज विधानसभेत (vidhansabha) पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी खोटं बोलत असेल तर माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात सर्व पुरावे आहेत. मी घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईल, असा संतप्त इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. तर, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील (dilip walse patil) यांनी मुख्यमंत्री किंवा आपण कुणालाही फोन केला नसल्याचं स्पष्ट करत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

विधानसभेत रवी राणा यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अडवण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उभं राहून राणा यांची बाजू घेतली आणि राणा यांना बोलण्याची परवानगी देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर रवी राणा यांनी संपूर्ण कहानी सभागृहात मांडली. आज मला आर आर पाटलांची आठवण येते. त्यांच्या सारखा गृहमंत्री या राज्याला पाहिजे. तुम्ही वाझे सारखे क्रिमिनल अधिकारी निर्माण कराल तर तुमची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल. या माझ्या भावना नाहीये, संपूर्ण समाजाच्या भावना आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही फोन करता हे महाराष्ट्राचे दुर्देव. माझ्याविरोधात रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल केला. एवढं प्रेशर आहे. एवढं प्रेशर आहे की रवी राणा दिसला तर गोळी मारा असं सांगितल्या गेल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं. अशा प्रकारची परिस्थिती असेल आणि मी खोटं बोलत असेल तर पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. मी फाशी घेईल. मला फाशी द्या, असं रवी राणा म्हणाले.

कारवाईसाठी पोलिसांवर दबाव होता

राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी शिवभक्तांनी पुतळा बसवला. दुग्धाभिषेक झाला. आरती झाली. दिवाळीसारखं वातावरण झालं. या पुतळ्याला कुणाचा विरोध नव्हता. पण पाच दिवसानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी छन्नी हातोड्याने पुतळा हटवला. कचऱ्याच्या गोडावूनमध्ये पुतळा टाकला. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. 9 तारखेला शिवभक्तांनी शाई फेकली. त्याचं समर्थन करणार नाही. त्या दिवशी रेल्वेच्या मिटिंगसाठी मी दिल्लीत होतो. तेव्हा 307 आणि 353चा गुन्हा दाखल झाला. मी माहिती घेतली तेव्हा पोलीस आयुक्त आरपी सिंग यांनी सांगितलं की, सरकारमधील काही लोकांनी मला हा गुन्हा दाखल करायला लावला. रवी राणांना अटक करण्यास सांगितलं, असं रवी राणा म्हणाले.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच गुन्हा

त्यानंतर माझ्या घरी 100 ते 150 पोलीस गेले. माझे आईवडील वृद्ध आहेत. त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालं आहे. त्यांना चालताही येत नाही. त्यांना 3 वाजता उठवून घराची झडती घेण्यात आली. खासदार नवनीत राणा यांना ताब्यात घेतला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सीपीला फोन करून मला अटक करण्यास सांगितलं. माझ्याकडे पुरावा आहे. पेन ड्राईव्हमध्ये पुरावा आहे, असा दावाही त्यांनी केला.

तर पोलीस बेछूट होतील

रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांनी काही केलं म्हणून अजित दादांना फासावर लटकवाल का? दिल्लीत असताना 307चा गुन्हा दाखल केला. पहिल्यांदा तर मूळ गुन्हेगारांवर छोटा गुन्हा लावला. मग कुणाचे फोन आले, त्यानंतर 307 चा गुन्हा दाखल केला. आमदार जागेवर नव्हते. घटनास्थळी नव्हते. चार दिवस दिल्लीत होते. तरीही त्यांच्यावर गुन्हा का लावला? बेकायदेशीर गुन्हा लावले जात असतील तर ज्यांनी गुन्हे लावले त्यांच्यावर कारवाई करा. नाही तर पोलीस बेछुट होतील. आज तुमचे राज्य आहे. एकदा का पोलीस बेछुट झाले तर या राज्यात काहीच होणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला.

पुतळा स्थापनेसाठी परवानगी नव्हती

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटना घडली त्या दिवशी पुतळ्याची स्थापना विना परवानगी केली गेली. कोणताही पुतळा बसवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. या पुतळ्याची उंची कमी होती. कुणाचा तरी रस्त्यावरून चालताना हात लागेल अशी पुतळ्याची उंची होती. त्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी पुतळा काढायचे ठरवलं. पोलिसांचं संरक्षण घेतलं आणि नियमाप्रमाणे अधिकारात कारवाई केली, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

आम्ही आदेश दिले नाही

पालिका आयुक्तांवर ज्या दिवशी शाई टाकली. पोलिसांना कठोर कारवाई करण्याशिवाय पर्यायच नव्हता असं वातावरण त्या दिवशी अमरावतीत झालं होतं. तरीही सदस्याने भावना व्यक्त केली आहे. त्याच्याशी मी सहमत आहे. तुम्ही दिल्लीत असताना तुमच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला असेल तर कोणत्या परिस्थितीत झाला त्याची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री आणि मी कारवाई करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. स्फोटक परिस्थिती बनते तेव्ही मी माहिती घेत असतो. मात्र कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या डीजीच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्या संदर्भातील अहवाल आल्यावर विरोधी पक्षनेत्यासोबत चर्चा करेल, असं वळसे-पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या:

फडणवीसांच्या कारवर चप्पल फेक, रोहित पवारांनी टोचले चप्पल भिरकावणाऱ्याचे कान

Video | रवी राणांवर 307 लावून सूड उगवला, अशाने पोलीस बेछूट होतील; फडणवीसांचा हल्लाबोल

Maharashtra News Live Update : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांची घोषणाबाजी