फडणवीसांच्या कारवर चप्पल फेक, रोहित पवारांनी टोचले चप्पल भिरकावणाऱ्याचे कान

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून फडणवीसांच्या कारवर चप्पल भिरकावणाऱ्याचे कान टोचले आहेत.

फडणवीसांच्या कारवर चप्पल फेक, रोहित पवारांनी टोचले चप्पल भिरकावणाऱ्याचे कान
फडणवीसांच्या कारवर चप्पल फेक, रोहित पवारांनी टोचले चप्पल भिरकावणाऱ्याचे कानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 12:14 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)हे पिंपरी-चिंचवडच्या (Pimpari Chinchwad) दौऱ्यावर असताना त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून फडणवीसांच्या कारवर चप्पल भिरकावणाऱ्याचे कान टोचले आहेत. फडणवीस हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे चप्पल फेकणे योग्य नाही. भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तर या प्रकरणी या राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात 10 तास बसवले जाते.या राज्यात तपास यंत्रणावर आरोपपत्र दाखल केले जात आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल फेक केली. चप्पल फेक करणाऱ्यांवर कुठला गुन्हा दाखल करणार आहेत ते पाहू, असं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या दरम्यान जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका अज्ञात व्यक्तीनं चप्पल फेकली. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला होता. गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ते यासंबंधी निवेदन देवेंद्र फडणवीस यांना देणार होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि वादाला सुरुवात झाली.

पोलिसांकडून शोध सुरू

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी यासंबंधी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना, पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने

दोन पवारांच्या निशाण्यावर राज्यपाल, अजित पवार, शरद पवार आज काय म्हणाले?

Pune Metro : …अशी साकार झाली पुणे मेट्रो ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा प्रवास

Non Stop LIVE Update
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.