AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: शरद पवार यांच्यावर आमदार-खासदार नाराज? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना घडलं काय?

Sharad Pawar NCP-SP: अजित पवार गटातील जवळपास 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दादांच्या गटातील अंतर्गत अंतर्गत वादामुळे या आमदारांनी हे पाऊल टाकल्याचं मानलं जात आहे.

Sharad Pawar: शरद पवार यांच्यावर आमदार-खासदार नाराज? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना घडलं काय?
शरद पवार, राष्ट्रवादी विलिनीकरणImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 8:45 AM
Share

Sharad Pawar on NCP Merger: बुधवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे अजेंड्यावर आले. अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत विलिनीकरणाचा महत्त्वाचा मुद्दाही या अजेंड्यावर अग्रस्थानी होता. या प्रश्नावर शरद पवार यांनी मौन धारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरून काही आमदार आणि खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे.

विलिनीकरणासाठी काही जण आग्रही?

अजितदादांच्या गोटात सध्या नाराजीनाट्य सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याचवेळी दादांच्या 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा तापला. हाच मुद्दा काल शरद पवार गटाच्या बैठकीत समोर आला. विलिनीकरण करणार का असा सवाल विचारल्या गेला. त्यावर शरद पवार यांनी मौन धारण केले. तर खासदार सुप्रिया सुळे आणि नेते जयंत पाटील यांनी या चर्चा फेटाळल्या. यामुळे काही आमदार आणि खासदार नाराज झाल्याचे समजते. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. शरद पवार यांनी विलिनीकरणाबाबत थेट मत व्यक्त करणे गरजेचे असल्याचे आमदार-खासदारांना वाटत होते. त्यामुळे दोन्ही गटातील काही जण विलिनीकरणासाठी आग्रही असल्याचे दिसून येते.

गेल्या आठवड्यात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. अजित पवार गटातील नाराजीमुळे ही भेट झाल्याचे बोलले जाते. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना हवा मिळाली होती. तर बैठकीनंतर शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

शरद पवार यांच्या NCP च्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तर सरकारविरोधात आंदोलनाचाही मार्ग स्पष्ट करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चांगला समन्वय असल्याचे स्पष्ट केले. पक्षाला पुढे नेण्यासाठी सर्वांची सोबत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार, आमदार, पक्ष कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे. विरोधी पक्षाच्या भूमिकेत राष्ट्रवादी अधिक आक्रमक दिसेल, असे शिंदे म्हणाले.

विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा सातत्याने झाली. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे झाले. पण त्यातून काही साध्य झाले नाही. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही यावरूनच खलबतं झाली. पण दोन्ही पक्षातील नेते एकाच टेबलावर चर्चेसाठी आले नाही. कालच्या शरद पवार राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ