मुंबई विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अपक्षाची उडी, शिवसेनेला दगाफटका होणार?

| Updated on: Nov 24, 2021 | 1:46 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईतून शिवसेनेने माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपनेही माजी आमदार राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अपक्षाची उडी, शिवसेनेला दगाफटका होणार?
shivsena leader sunil shinde
Follow us on

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईतून शिवसेनेने माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपनेही माजी आमदार राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे. दोनच जागांसाठी ही निवडणूक होत असल्याने दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक तिरंगी होणार आहे. कोपरकर यांच्या उमेदवारीमुळे सुनील शिंदे यांना दगाफटका होणार का? याबाबतही महापालिकेत चर्चा रंगली आहे.

येत्या 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सुरेश कोपरकर मैदानात राहतात की माघार घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोपरकर हे मैदानात राहिले किंवा नाही राहिले तरी त्याचा शिवसेनेला फारसा फरक पडणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कोपरकर यांच्या उमेदवारीमुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक होणार आहे.

कोटा पुरेपूर, तरीही रंगत

विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयासाठी 77 मतांची अवश्यकता आहे. शिवसेना आणि भाजपकडे त्यापेक्षा अधिक मते आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडून येणार असल्याचं सांगितलं जातं. तर कोपरकर यांना किती मते मिळतात? शिवसेना किंवा भाजपचे मते फोडण्यात कोपरकर यशस्वी ठरतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गुप्त मतदान होणार असल्याने त्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

कसं आहे गणित?

भाजपकडे 83 तर शिवसेनेकडे 99 मतांचा कोटा आहे. काँग्रेसकडे 30, एनसीपी 8, सपा 6, एमआयएम 2 आणि मनसेकडे एक मत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा आणि एमआयएमची मते एकत्रित केले तरी विजयासाठी अवश्यक असलेली 77 मते कोपरकर मिळवू शकत नाहीत. त्यामुळे कोपरकर जिंकण्यासाठी काय जुगाड करतात की अर्जच मागे घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आगामी वर्षी होणाऱ्या महापालिका निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदान कसं पदरात पाडून घेता येईल याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

24 नोव्हेंबर रोजी नामांकन अर्जांची छाननी
26 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
10 डिसेंबर रोजी मतदान
11 डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल

 

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीचं कारण गुलदस्त्यात

Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार

साहित्य संमेलनात वादाचा रतीब; गीतामध्ये शाहीर परदेशींच्या ऐवजी चक्क अज्ञाताचे छायाचित्र, अगाध ज्ञानाचे धक्क्यावर धक्के!