डोंबिवलीतील अनधिकृत रिक्षावाले पकडण्याची मनसेची मोहीम

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: मनसे कार्यकर्त्यांनी प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला चोप दिल्याची घटना ताजी असतानाच, आता डोंबिवलीतही मनसेने रिक्षाचालकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवलीत आज मनसेनं अनधिकृत रिक्षास्टॅण्डवर धडक दिली. डोंबिवली पूर्वेला रेल्वे स्टेशनच्या बाहेरच हे अनधिकृत रिक्षास्टॅण्ड उभारण्यात आलं आहे. या स्टँडवर जाऊन मनसेनं रिक्षाचालकांचे बॅच, परवाने, कागदपत्रं तपासली. यावेळी एका रिक्षाचालकाकडे लायसन्स, बॅच, रिक्षाची कागदपत्रं यापैकी […]

डोंबिवलीतील अनधिकृत रिक्षावाले पकडण्याची मनसेची मोहीम
Follow us on

मुंबई: मनसे कार्यकर्त्यांनी प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला चोप दिल्याची घटना ताजी असतानाच, आता डोंबिवलीतही मनसेने रिक्षाचालकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवलीत आज मनसेनं अनधिकृत रिक्षास्टॅण्डवर धडक दिली.

डोंबिवली पूर्वेला रेल्वे स्टेशनच्या बाहेरच हे अनधिकृत रिक्षास्टॅण्ड उभारण्यात आलं आहे. या स्टँडवर जाऊन मनसेनं रिक्षाचालकांचे बॅच, परवाने, कागदपत्रं तपासली. यावेळी एका रिक्षाचालकाकडे लायसन्स, बॅच, रिक्षाची कागदपत्रं यापैकी काहीही आढळून आलं नाही. त्यामुळं मनसे शहराध्यक्ष राजेश कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

अशा अनधिकृत रिक्षाचालकांनी उद्या एखादा गुन्हा केला, तर त्यांना कुठे शोधणार? असा सवाल करत यापुढे असे अवैध धंदे डोंबिवलीत चालू देणार नसल्याचा इशारा मनसेनं दिला. या संपूर्ण घटनेत ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओ काय करतंय असा सवाल उपस्थित झाला आहे.