Raj Thackeray Drivers COVID | राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना कोरोनाची लागण

| Updated on: Jun 23, 2020 | 9:04 AM

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या शासकीय सुरक्षा रक्षकांनी 'कोरोना'वर यशस्वी मातही केली होती. (MNS Chief Raj Thackerays two drivers tested positive for COVID)

Raj Thackeray Drivers COVID | राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना कोरोनाची लागण
Raj Thackeray Krishna Kunj
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनचालकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. दोघा वाहनचालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (MNS Chief Raj Thackerays two drivers tested positive for COVID)

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केली. सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं.

संपूर्ण बातमी इथे वाचा : ‘कृष्णकुंज’बाहेर कोरोनाला रोखलं, राज ठाकरेंच्या ताफ्यातील दोन पोलिसांची कोरोनावर मात

धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना  ब्रीच कँडी रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात 3 हजार 721 नवे रुग्ण 

राज्यात काल (22 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 721 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 796 वर पोहोचली आहे. राज्यात दिवसभरात 1 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. तर 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 6 हजार 283 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल कोरोनाचे 1098 नवे रुग्ण आढळले. मुंबई आतापर्यंत 67 हजार 586 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, यापैकी कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 34 हजार 121 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या मुंबईत 29 हजार 720 रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.