AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : मनसेला मुंबईत मोठा धक्का, विश्ववक्रमी दहीहंडीमुळे फेमस झालेल्या नेत्याला अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक केल्या प्रकरणात अटक

MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. दहीहंडी उत्सवामुळे प्रसिद्ध झालेल्या नेत्याला बिल्डर फसवणूक प्रकरणात अटक झाली आहे.

MNS : मनसेला मुंबईत मोठा धक्का, विश्ववक्रमी दहीहंडीमुळे फेमस झालेल्या नेत्याला अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक केल्या प्रकरणात अटक
ganesh chukkal
| Updated on: Oct 02, 2026 | 5:17 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर , प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील मनसेचे बडे नेते, विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना अटक करण्यात आली आहे.पवई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिरानंदानी परिसरातील विकासकाशी संबंधित फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. गणेश चुक्कल यांना दहीहंड उत्सवामुळे ओळख मिळाली. त्यांनी यंदा घाटकोपरमध्ये काही लाख रुपयांची दहीहंडी बांधली होती. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली, त्यावरुन वादही झाला होता. हिरानंदानी समूहाच्या संचालिका अलका भाटिया ऊर्फ हिरानंदानी यांनी तक्रार दिली होती. गणेश चुक्कल ज्या इमारतीत राहतात, त्याच बिल्डिंगमध्ये अलका भाटिया यांची बनावट सही करुन फ्लॅट भाड्यावर दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हिरानंदानी ग्रुपच्या संचालिका अलका भाटिया उर्फ अलका हिरानंदानी यांच्या स्वाक्षरीची बनावट केल्याचा आरोप. ⁠अलका हिरानंदानी या अभिनेता अक्षय कुमारच्या बहिण आहेत. फ्लॅट नं. 3505, ओडोनियो बिल्डिंगसाठी 30 वर्षांची बनावट लीज डीड तयार केल्याचा आरोप आहे. पवई पोलिसांनी गणेश अर्जुन चुक्कल याला 2 ऑक्टोबरला अटक केली. ⁠चुक्कल विरोधात C.R. No. 978/2022 नुसार IPC कलम 420, 465, 467, 471 अंतर्गत गुन्हा. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. पुढील तपासासाठी पवई पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू.

पोलीस कोठडी सुनावण्यात आली

गणेश चुक्कल यांना आज हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना पाच ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश चुक्कल यांच्याविरोधात या प्रकरणात 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सुरु होता. अखेर त्यांना आता अटक झाली. हिरानंदानी परिसरातील विकासकाने गणेश चुक्कल यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती.

पवई पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवण्यात आले

त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित आरोप गणेश चुक्कल यांनी यापूर्वी फेटाळले होते. या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन नोंदींमध्ये हिरानंदानी समूहाशी संबंधित मालमत्ता आणि कराराचा वादही नमूद आहे. ऑक्टोबर 2024 मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात गणेश चुक्कल यांचा संबंधित फ्लॅटच्या ताब्याशी निगडित वादातील पक्षकार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप