मुंबईत अ‍ॅमेझॉनविरूद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन!

| Updated on: Dec 17, 2020 | 9:49 AM

वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. | No Marathi No Amazon

मुंबईत अ‍ॅमेझॉनविरूद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन!
Follow us on

मुंबई: अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरु केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून (MNS) मुंबईभरात अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. (No Marathi No Amazon posters in Mumbai by MNS)

वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता अ‍ॅमेझॉनकडून यावर काय तोडगा काढण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही यावेळी मनसेने दिली होती.

मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

अ‍ॅमेझॉन’च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत आले होते.

संबंधित बातम्या:

अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

(No Marathi No Amazon posters in Mumbai by MNS)