मनसेने मुंबईच्या महापौरांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला

| Updated on: Jul 02, 2019 | 1:19 PM

माजी नगरसेवक आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला.

मनसेने मुंबईच्या महापौरांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला
Follow us on

मुंबई :  मुंबईत पाणी तुंबलं नाही असं म्हणणाऱ्या मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खिल्ली उडवली. माजी नगरसेवक आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला. मुंबईत पावसाचे पाणी तुंबलं नाही, असं वक्तव्य महापौरांनी काल केलं होतं. त्यावरुन मनसेने महापौरांवर टीकास्त्र सोडलं.

संदीप देशपांडे म्हणाले, “मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर साहेब यांना मुंबईत तुंबलेलं पाणी, लोकांना झालेला त्रास दिसलाच नाही. ते स्वत: म्हणाले शिक्षक आहेत त्यामुळे खोटे बोलत नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. म्हणून खास महापौरांसाठी हा जाड भिंगाचा चष्मा आणला आहे. या चष्म्यातून तरी महापौरांना दिसावं, अशी आमची अपेक्षा आहे. हा चष्मा आम्ही महापौरांना कुरिअरने पाठवत आहोत. ज्या नेत्यांना मुंबईची दुरावस्था दिसत नाही, त्या सर्वांसाठी मोफत चष्मा पाठवण्याचं काम मनसे करेल”

[svt-event title=”मनसेकडून महापौरांची खिल्ली” date=”02/07/2019,1:18PM” class=”svt-cd-green” ]

महापौर काय म्हणाले होते?

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काल “मुंबई कुठेही तुंबली नाही, मुंबईत सर्व काही आलबेल सुरु आहे. तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करु नका“, असा अजब दावा केला. महापौरांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. महापौरांच्या या वक्तव्यानंतर सर्व मुंबईकरांना हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईत पाणी तुंबलं नाही, महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा दावा