AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar: परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीशी गैरवर्तन, मोबाईलवर वारंवार फोन, संतप्त नातेवाईक शाळेत घुसले अन्…

Chhatrapati Sambhajinagar Crime News: इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीशी लगट करणाऱ्या आणि तिच्या मोबाईल क्रमांकावर सातत्याने कॉल करून छळणाऱ्या शिक्षकाला नातेवाईकांनी चांगलाच धडा शिकवला.

Chhatrapati Sambhajinagar: परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीशी गैरवर्तन, मोबाईलवर वारंवार फोन, संतप्त नातेवाईक शाळेत घुसले अन्...
शिक्षकाला चोपImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 11:10 AM
Share

Chhatrapati Sambhajinagar Crime News: सध्या राज्यात इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर एक धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी येथील शिक्षकाने ओळख केली. तिचा मोबाईल क्रमांकही मिळवला. त्यानंतर तिच्याशी त्याने गैरवर्तन केले. तिला तो वारंवार फोन करून त्रास देऊ लागला. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगितला. संतप्त पालकांनी थेट शाळा गाठली. हा प्रकार कळताच संस्था चालकही भडकले. या सर्वांनी शिक्षकाची चांगलीच धुलाई केली. प्रकरण उघड होताच संतप्त नातेवाईकांनी संस्थेत धाव घेत शिक्षकाला चोप दिला. शिक्षकाला चोप देतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बोर्ड परीक्षेचा ताण, शिक्षकाचा ताप

या विद्यार्थिनीला संबंधित शाळेचं परीक्षा केंद्र मिळालं होतं. तिथं या शिक्षकांची परीक्षा केंद्रावर नेमणूक होती. परीक्षा सुरू असताना या शिक्षकाने तिच्याशी ओळख वाढवली. तिला विश्वासात घेतले. तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर तिच्याशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यानंतर तो तिला वारंवार फोन करू लागला. हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीने ही बाब घरी सांगितली. संतप्त नातेवाईकांनी थेट संबंधित महाविद्यालय गाठले.

चूक केली कबूल

संतप्त नातेवाईक या शिक्षण संस्थेत दाखल झाले. त्यांनी घडलेला प्रकार संस्था चालकांनासह इतर शिक्षकांना सांगितला. या शिक्षकाला बोलवण्यात आले. त्याने चूक झाल्याचे मान्य केले. त्यानंतर नातेवाईकच नाही तर संस्था चालकानेही त्याला चोप दिला. या शिक्षकाने इतर विद्यार्थिनीनाही त्रास दिला काय याची आता चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेने परीक्षा केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला. इतर पालकांनी शिक्षकावर तात्काळ कारवाईची मागणी केली.

शिक्षक निलंबित, चौकशी समिती गठीत

परीक्षा केंद्र परिसरात असा प्रकार घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. शिक्षकाने चूक कबूल केल्यानंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. शिक्षण संस्थेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत चौकशी समिती गठीत केली. हा शिक्षक चौकशीत दोषी आढळला तर त्याच्यावर पुढील कडक कारवाई करण्याचे आश्वासन संस्थेने दिले. परीक्षा केंद्रावर असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे आश्वासन पालकांना देण्यात आले आहे. तर घटना कळताच पोलिसांनी शाळेत धाव घेतली. या विद्यार्थिनीचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?