वंदे भारत मिशन, जगभरातील 16 हजारांहून अधिक नागरिक मुंबईत दाखल, आणखी 49 विमानं भरुन येणार

| Updated on: Jun 22, 2020 | 6:18 PM

केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत (Vande Bharat Mission) जगभरातील विविध देशांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं जात आहे.

वंदे भारत मिशन, जगभरातील 16 हजारांहून अधिक नागरिक मुंबईत दाखल, आणखी 49 विमानं भरुन येणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत (Vande Bharat Mission) जगभरातील विविध देशांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं जात आहे. या अभियानांतर्गत विविध देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच आहे. मुंबईत आतापर्यंत 105 विमानांद्वारे तब्बल 16 हजार 234 प्रवासी दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईच्या प्रवाशांचा आकडा 6 हजार 9 इतका आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 5 हजार 398 एवढी आहे (Vande Bharat Mission).

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानाचा तीन महिन्यांपूर्वी भारतात शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे देशातील सर्व रेल्वे, विमानसेवा बंद पडली. या लॉकडाऊन दरम्यान विदेशात जवळपास 2 लाख भारतीय अडकले. यापैकी अनेक नागरिकांनी केंद्र सरकारकडे भारतात परत घेऊण जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन’ची आखणी केली.

हेही वाचा : Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?

वंदे भारत अभियानांतर्गत 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 49 विमानांनी प्रवासी मुंबईत दाखल होणार आहेत. हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केलं जात आहे.

हेही वाचा : माजी केंद्रीय मंत्र्यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, पवारांना पत्र लिहित राजीनामा

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

वंदे भारत अभियानातर्गत ‘या’ देशांतून प्रवासी मुंबईत दाखल

वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांतून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.