भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा अवधी

| Updated on: Sep 03, 2021 | 5:05 PM

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे दोन्ही सहकारी आज ईडीसमोर हजर राहिले नाहीत. या दोघांनीही ईडीला पत्रं पाठवून हजर राहण्यासाठी 15 दिवसांची वेळ देण्याची विनंती केली आहे. (MP bhawana gawali colleage seeks 15 days time to appear before ED)

भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा अवधी
ED
Follow us on

मुंबई: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे दोन्ही सहकारी आज ईडीसमोर हजर राहिले नाहीत. या दोघांनीही ईडीला पत्रं पाठवून हजर राहण्यासाठी 15 दिवसांची वेळ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (MP bhawana gawali colleage seeks 15 days time to appear before ED)

भावना गवळी यांचे सहकारी सईद खान आणि हकीम शेख यांना ईडीने समन्स बजावलं होतं. या दोघांनाही 2 सप्टेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, हे दोघेही ईडीच्या कार्यालयात आले नाहीत. त्यांनी ईडीला पत्रं पाठवून 15 दिवसांचा अवधी देण्याची विनंती केली आहे. आम्हाला चौकशीला सामोरे जाण्यासाठी 15 दिवसांचा अवधी द्यावा. त्यानंतर आम्ही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ आणि सहकार्यही करू, असं त्यांनी म्हटलं आहे. चौकशीला उपस्थित न राहण्यामागे वैयक्तिक कारणही त्यांनी दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. हकीम शेख हे गवळी यांचे सीए आहेत.

नोटीस नसताना धाडी

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भावना गवळी यांनी 30 ऑगस्ट रोजी प्रतिक्रिया दिली होती. केंद्र सरकाची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर ईडी होत असेल तर अनेकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला होता. मला कोणतीही नोटीस आलेली नाही. मला नोटीस मिळालेले नाही. त्यामुळेच हा सर्व प्रकार जुल्मी आहे. एक महिला सातत्याने निवडून येत असल्याने तिला डॅमेज करण्याचा हा प्रकार आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. भावना गवळी सातत्याने पाच वेळा निवडून येते आणि ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण देण्याचं काम करते. मी कुणाची जमीन घेतली नाही. सरकारचा पैसा वापरला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

सोमय्याचे आरोप काय?

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयाची चोरीची फिर्याद 2020 मध्ये दिली. मात्र सात कोटी रुपये आले कोठून असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाण्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही यावेळी सोमय्या यांनी केला आहे. (MP bhawana gawali colleage seeks 15 days time to appear before ED)

 

संबंधित बातम्या:

ED Raid : आधी अनिल परबांना नोटीस, आता ईडीकडून भावना गवळींच्या 5 ठिकाणांवर धाडी

BREAKING – किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक

भावना गवळी कारखाना घोटाळा प्रकरणी पोलिसांना झटका, न्यायालयाकडून कारवाईचं शपथपत्र देण्याचे आदेश

(MP bhawana gawali colleage seeks 15 days time to appear before ED)