AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई : एसी लोकलचा AC बंद; प्रवासी गुदमरले, अनेक महिला बेशुद्ध

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकावर एसी लोकलचा AC 15 मिनिटांपासून बंद पडला होता, त्यामुळे अनेक प्रवासी गुदमरले असल्याचे समोर आले होते. यात अनेक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे.

मुंबई : एसी लोकलचा AC बंद; प्रवासी गुदमरले, अनेक महिला बेशुद्ध
Mulund AC Local NewsImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 13, 2026 | 2:49 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकावर एसी लोकलचा AC 15 मिनिटांपासून बंद पडला होता, त्यामुळे अनेक प्रवासी गुदमरले असल्याचे समोर आले होते. यात अनेक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी गर्दीच्या वेळेत मुंबईतील एसी लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने AC यंत्रणा अचानक बंद पडल्याने मुलुंड स्थानकावर ट्रेन थांबलेली असताना डब्यांतील प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. या घटनेत एका प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

गर्दीच्या वेळी घडली घटना

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 9.26 वाजता घडली. सकाळी 8.33 वाजता टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकल मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी असताना तिच्या एसी यंत्रणेत बिघाड झाला. जवळपास 15 मिनिटे एसी बंद असल्याने गर्दीने भरलेल्या डब्यांतील तापमान झपाट्याने वाढले. सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे दरवाजे लॉक असतात आणि प्रवाशांना ते हाताने उघडता येत नाहीत. एसी बंद झाल्यामुळे हवा खेळती न राहिल्यामुळे अनेक प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.

3 प्रवाशांची प्रकृती बिघडली

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन प्रवाशांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली, त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. मात्र फहीम अन्सारी या प्रवाशाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इतर दोघांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रेल्वे कर्मचारी आणि सहप्रवासी त्रास होत असलेल्या प्रवाशांना मदत करताना दिसत आहेत.

रेल्वे प्रशासनाने काय म्हटले?

मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी या घटनेबाबत सांगितले की, टिटवाळ्याहून सीएसएमटी कडे जाणारी 8:53 च्या एसी लोकलमधील कोचमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. कोच मधील 3 प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला होता, आता परिस्थिती सगळी नॉर्मल आहे. ज्या एसी लोकलमधे तांत्रिक बिघाड झाला होता, ती लोकल कुर्ला स्थानकावरून डिस्चार्ज करण्यात आली आहे. असा एसीचा तांत्रिक बिघाड कोचमध्ये पुन्हा होऊ नये यासाठी तांत्रिकदृष्ट्या आम्ही अधिक काळजी घेऊ. सध्या मध्य रेल्वेवरील सर्व लोकल सेवा या वेळेवर सुरळीत सुरू आहेत.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....