Mumbai Accident: मुंबईत BEST बस चालकाचे नियंत्रण सुटले अन्…; एर्टिगा आणि क्रेटाचा चक्काचूर, भीषण अपघात!

BEST Bus Wadala Accident: मुंबईत BEST बसचा भीषण अपघात झाला आहे. दोन कारला जोरदार धडक बसली आहे. यात सहा जण जखमी झाले आहेत. तर चालकाची प्रकृती गंभीर आहे.

Mumbai Accident: मुंबईत BEST बस चालकाचे नियंत्रण सुटले अन्...; एर्टिगा आणि क्रेटाचा चक्काचूर, भीषण अपघात!
BEST Bus Rams Two Cars at Wadala Junction
| Updated on: Nov 09, 2026 | 11:22 PM

मुंबईतील वडाळा पूर्व परिसरात BEST बसचा भीषण अपघात झाला आहे. लोढा जंक्शन, न्यू कफ परेड परिसरातील वाहतूक सिग्नलवर उभ्या असलेल्या दोन कारला मागून येणाऱ्या BEST बसने जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एर्टिगा कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (९ नोव्हेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लोढा जंक्शन येथील वाहतूक सिग्नलवर एक BEST बस थांबली होती. या बसच्या मागे एर्टिगा आणि क्रेटा या दोन कारही सिग्नल सुरू होण्याची प्रतीक्षा करत उभ्या होत्या. त्याचवेळी मागून वेगाने आलेल्या दुसऱ्या BEST बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने समोर उभ्या असलेल्या दोन्ही कारला जोरदार धडक दिली.

Loading...

या धडकेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात एर्टिगा कारमधील चार जण जखमी झाले आहेत. यामध्ये कारच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. इतर तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर क्रेटा कारमधील एक पुरुष आणि एक महिला असे दोन प्रवासीही जखमी झाले आहेत. अशा प्रकारे या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

सर्व सहा जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ या परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली. या अपघाताची अधिक माहिती पोलीस गोळा करत असून नेमका अपघात कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. संबंधित प्रकरणात आवश्यक कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. BEST बस चालकाचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास झाल्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे.

पुण्यातील रामबाग रोडवरील नवलाई मंदिरासमोर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसली.  या धडकेनंतर ट्रक चालकाने ट्रक न थांबवता तसाच पुढे पळवला. ट्रक खाली दुचाकी अडकून सुमारे 300 मीटर पर्यंत फरफटत नेली. यावेळी झालेल्या घर्षणामुळे ट्रकने पेट घेतला. दुचाकीसह ट्रक जळून खाक झाला. यात दुचाकीवरील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच भोर नगर पालिकेचे अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दोन्हीही वाहन जळून खाक झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us