औरंगाबादच्या कोव्हिड सेंटर प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ‘एसओपी’ लागू करणार

| Updated on: Mar 04, 2021 | 1:33 PM

राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत (SOP Will Be Implemented In The COVID Center) एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल.

औरंगाबादच्या कोव्हिड सेंटर प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ‘एसओपी’ लागू करणार
Ajit Pawar
Follow us on

मुंबई : राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत (SOP Will Be Implemented In The COVID Center) एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटर्ससाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली (Ajit Pawar Says SOP Will Be Implemented In The COVID Center For The Safety Of Women Till 31st March).

अजित पवार विधानसभेत काय म्हणाले?

औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या मुद्द्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल”.

नेमकं प्रकरण काय?

औरंगाबादच्या पदमपुरा कोव्हिड केअर सेंटरमध्ये (Coivd Centre) कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा (Molestation) प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे माहिती आहे. रात्रीच्यावेळी कोव्हिड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तेथून पळ काढला.

ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच, आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. तसेच, याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

Ajit Pawar Says SOP Will Be Implemented In The COVID Center For The Safety Of Women Till 31st March

संबंधित बातम्या :

जळगावची धनिक बाळे, करती अश्लील चाळे, महाराष्ट्राला हादरवणारं सेक्स स्कँडल काय होतं? वाचा सविस्तर

हाच तो व्हिडीओ ज्याच्यामुळे जळगाव पोलीसांचं ते कृत्य उघडं पडलं, पाहा तो व्हिडीओ…