AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, मुंबईत बीएमसीच्या ऑफिससमोर दोन कंत्राटदार भिडले, परस्परांवर चाकू हल्ला

बीएमसीच्या एफ नॉर्थ वार्ड ऑफिससमोर दोन कंत्राटदारांमध्ये हाणामारी झाली आहे. दोघानीही एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक, मुंबईत बीएमसीच्या ऑफिससमोर दोन कंत्राटदार भिडले, परस्परांवर चाकू हल्ला
BMC F North Ward Office
| Updated on: Aug 04, 2026 | 9:48 AM
Share

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई महापालिकेच्या एफ नॉर्थ वार्ड ऑफिससमोर दोन कंत्राटदारांमध्ये हाणामारी झाली आहे. विषय फक्त हाणामारीपुरता मर्यादीत न राहता दोघांनीही एकमेकांवर चाकूने हल्ला केला. दोघेही यामध्ये गंभीर जखमी झाले असून दोघांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही कंत्राटदारांकडे चाकू होते. एकाच्या पोटाला आणि दुसऱ्याच्या पायावर चाकुने वार झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. एका टेंडरवरून दोघांमध्ये हाणामारी झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. माटुंगा पोलिसानी दोघांच्याही विरोधात हत्येचा प्रयत्न केलाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय. आता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दोन्ही कंत्राटदारांमध्ये कॉन्ट्रॅक्टवरुन ही हाणामारी झाली. कुठल्या कॉन्ट्रॅक्टवरुन हे कंत्राटदार आपसात भिडले ते तपासातून समोर येईल. काल ही घटना घडली. मुंबईत कंत्राटदार अशा प्रकारे परस्परांवर चाकू हल्ला करत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे. महत्वाचं म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर चाकू घेऊन आत कसे पोहोचले? हा मुद्दा आहे. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांची जबानी नोंदवली जाईल. त्यानंतर त्यांना अटकही केली जाऊ शकते. महापालिका कार्यालयांमध्ये दररोज अनेक नागरीक येत असतात. आतमध्ये प्रवेश करताना दारातच मेटल डिटेक्टर असतो. त्यातून तपासणी झाल्यानंतर आत प्रवेश मिळतो. मग हे कॉन्ट्रॅक्टर आत कसे पोहोचले? हा मुद्दा आहे.

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेकडून कंत्राट मिळवण्यासाठी कंत्राटदारांमध्ये चढा-ओढ असते. पण त्यातून अशा प्रकारे परस्परांवर जीवघेणा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलीस तपासातून बऱ्याच गोष्टी समोर येतील.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी