AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Boat Accident : Titanic सारखी घटना, आधी बोटीला छिद्र पडलं, मग….प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव

Mumbai Boat Accident : मुंबईत बुधवारी संध्याकाळी गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात भीषण दुर्घटना घडली. नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली. नीलकमल या प्रवासी बोटीमध्ये 100 पेक्षा जास्त लोक होते. या अपघाताने टायटॅनिक दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

Mumbai Boat Accident : Titanic सारखी घटना, आधी बोटीला छिद्र पडलं, मग....प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
Mumbai Boat Accident
| Updated on: Dec 19, 2024 | 9:45 AM
Share

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे अनेक हसती-खेळती कुटुंब दु:खात बुडाली. वेगात येणारी नेवीची स्पीड बोट नीलकमल या प्रवासी बोटीला धडकली. नेवीच्या बोटीवर तीन नौसैनिक होते. त्यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला आहे. नीलकमल बोटीवरील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत बोटीवरील 100 पेक्षा जास्त प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले. जे लोक या अपघातातून बचावले, ते कधीच ही घटना विसरणार नाहीत. या अपघातात, ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं, ते प्रचंड दु:खात आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार, या अपघाताने टायटॅनिक जहाज दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.

या बोट दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, “नौदलाच्या स्पीड बोटीचा वेग ताशी 100 किलोमीटर होता. समुद्रात स्पीड बोड गोल-गोल फेऱ्या मारत होती. अचानक वेगात येऊन ही स्पीड बोट आमच्या बोटीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, सगळी बोट हलली. बोटीला छिद्र पडलं व त्यात पाणी जमा होऊ लागलं”

रामने काय सांगितलं?

नीलकमल या प्रवासी बोटीवरील लोक गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला चालले होते. यात बंगळुरुवरुन मित्रांसोबत मुंबई फिरण्यासाठी आलेला राम ही होता. त्याने सांगितलं की, “एलिफंटा गुफा पाहण्यासाठी आम्ही बोटीने चाललो होतो. सोबत तीन मित्र होते. समुद्रात एका टप्प्यावर वेगात आलेली स्पीड बोट आमच्या बोटीला धडकली. त्यांनी लाइफ जॅकेट घातले होते. टक्कर होताच आमच्या नावेत पाणी भरु लागले. बोट तुटली, दोन भाग झाले. काही लोक समुद्रात बुडाले. एक महिला बुडत होती तिला मी वर खेचलं”

मावशीचा शोध लागत नाहीय

उत्तर प्रदेशचा गौतम मुंबईत राहतो. त्याची आई, बहिण आणि मावशी मुंबई फिरण्यासाठी उत्तर प्रदेशातून येथे आले होते. ते नावेमध्ये होते. या दुर्घटनेतून आई आणि बहिण बचावल्याच गौतमने सांगितल. पण मावशीबद्दल माहिती मिळत नाहीय. अनेकांचा आपल्या कुटुंबाशी संपर्क झालेला नाही. वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने संपर्क होत नाहीय.

14 वर्षांचा तरुण फिरण्यासाठी आलेला

14 वर्षांचा तरुण आपल्या नातेवाईकांसोबत फिरण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत आई-वडिल, भाऊ आणि वहिनी होते. तो त्यांचा शोध घेत आहे. आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण अन्य लोकांबद्दल माहिती मिळत नाहीय. प्रशासनाने मदतीला उशिर केला, असं बचावलेल्या लोकांच म्हणण आहे. अलीकडच्या काही वर्षात समुद्रात झालेला हा मोठा अपघात आहे.

Follow Us
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...