मुंबईत आहात आणि तुमची चाचणी पॉझिटीव्ह आली, काय करायचं? ‘या’ नंबरवर संपर्क करा

जर तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर तुम्ही काय करु शकता याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Mumbai Covid 19 War Rooms Contact)

मुंबईत आहात आणि तुमची चाचणी पॉझिटीव्ह आली, काय करायचं? या नंबरवर संपर्क करा
bmc
| Updated on: Apr 07, 2021 | 4:16 PM

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून काही नंबर जारी करण्यात आले आहे. जर तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर तुम्ही काय करु शकता याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Mumbai Covid 19 War Rooms Contact)

मुंबईत जर तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहिती घेऊ शकतो. यासाठी पालिकेने त्यांच्या 24 वॉर्डात त्यांचे वॉर रुम तयार केल्या आहे. या वॉररुमद्वारे तुम्हाला संपूर्ण मदत आणि माहिती दिली जाईल. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास यावर संपर्क साधा 

A – 022-22700007
B – 022-23759023/ 022-23759025
C – 022-22197331
D- 022-23835004/ 8879713135
E- 022-23797901
F South – 022-24177507/ 8657792809
F North – 022-241011380/ 8879150447/ 8879148203
G South – 022-24219515/ 7208764360
G- North – 022-24210441/ 8291163739
H- East – 022-26635400
H West – 022-26440121
K East – 022-26847000/ 8657933681
K West – 022-26208388
P South – 022-28780008/8828476098/7304776098
P North – 022-2844001/ 9321598131
R South – 022-28054788/ 8828495740
R North – 022-28947350/ 8369324810
R Central – 022-28947360/ 9920089097
L – 7678061274/ 7304883359/ 7710870510
M East – 022-25526301/ 7208680538/ 7208590415
M West – 022-25284000
N- 022-21010201
S – 022-25954000/ 9004869724
T- 022-25694000

मुंबईत दिवसभरात 10 हजारापेक्षा अधिक रुग्ण

गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर 7 हजार 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 77 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आज दिवसभरात 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 19 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 20 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.79 टक्के झाला आहे. (Mumbai Covid 19 War Rooms Contact)

संबंधित बातम्या : 

25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह राजेश टोपे यांच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या, वाचा सविस्तर

Mumbai Corona Vaccine : मुंबईकरांच्या चिंतेत भर, 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा!