AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Deputy Mayor : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांच्यावर आली मुंबई शहरात घर मागण्याची वेळ, कारण..

Mumbai Deputy Mayor : संजय घाडी हे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. भारतीय विद्यार्थी सेनेच्या काळापासून राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची मैत्री होती. नंतर ते मनसेमधून उद्धव ठाकरे शिवसेनेत गेलें. नगरसेवक बनले. आता तिथून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.

Mumbai Deputy Mayor : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांच्यावर आली मुंबई शहरात घर मागण्याची वेळ, कारण..
Sanjay Ghadi
| Updated on: Jul 13, 2026 | 9:45 AM
Share

मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी पत्र लिहून मुंबई शहरात घर देण्याची मागणी केली आहे. संजय घाडी हे दहीसरमध्ये राहतात. संजय घाडी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत. मुंबई महापालिकेतील विविध बैठकांची वेळ गाठताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. म्हणून पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतील शहर भागातच निवासस्थान मिळावे अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलं आहे. राणी बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आधी मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान दादर शिवाजी पार्क परिसरात होतं. पण तिथे महापौर बंगल्यात आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेतील महापौरांचा बंगला हा आता भायखळ्यातील राणीच्या बागेत आहे. या बंगल्याच्या शेजारीच महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा सेवानिवासस्थान असलेला बंगला आहे. याच बंगल्यासाठी उपमहापौर संजय घाडी प्रयत्नशील आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी संजय घाडी यांनी या घटनेसाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं होतं. त्यांच्यावर बरेच आरोप केले होते. “परवाच मॅडमना भेटलो, त्यावेळी सुद्धा आठवण करुन दिली. पण त्यांनी ढम्म प्रतिक्रिया दिली. आयुक्तांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मी मागणी करतो” असं संजय घाडी म्हणाले.

राज ठाकरेंसोबत होती मैत्री

संजय घाडी हे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. भारतीय विद्यार्थी सेनेच्या काळापासून राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची मैत्री होती. नंतर ते मनसेमधून उद्धव ठाकरे शिवसेनेत गेलें. नगरसेवक बनले. आता तिथून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे