AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरांची कमाल… भूल न देताच केलं नागाचं CT स्कॅन; मुंबईतील सापाला जीवदान

Cobra CT Scan : मुंबईतील डॉक्टरांनी एका जमखी सापावर उपचार करून त्याला जीवदान दिले आहे. यासाठी सापाचे आधुनिक पद्धतीने सीटी स्कॅनही करण्यात आले.

डॉक्टरांची कमाल... भूल न देताच केलं नागाचं CT स्कॅन; मुंबईतील सापाला जीवदान
Mumbai Snake CT scanImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 15, 2026 | 6:25 PM
Share

मुंबईतील चेंबूर परिसरात बांधकाम सुरू असताना एक जखमी अवस्थेत असलेला इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा (नाग) आढळला होता. या सापाला डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून आवश्यक उपचार करून जीवदान दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा नाग पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे सीची स्कॅन करताना या सापाला भूल देण्यात आली नव्हती. डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर करून हे स्कॅन केले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा नाग एका चेंबूरमधील बांधकामस्थळी जखमी अवस्थेत आढळला होता. प्राथमिक उपचारांनंतर पशुवैद्यक डॉ. दीपा कात्याल यांनी अधिक तपासणीसाठी त्याला फ्रेडना व्हेट डायग्नोस्टिक्स येथे पाठवले. तेथे तज्ज्ञांनी जखमेचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी आणि योग्य उपचार करण्यासाठी सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला.

नागाचा सीटी स्कॅन कसा करण्यात आला?

पशुवैद्यकांच्या मते, जिवंत सापाचा सीटी स्कॅन करणे अत्यंत आव्हानात्मक असते, कारण तपासणीदरम्यान त्यांना पूर्णपणे स्थिर ठेवणे आवश्यक असते. सापाला एका जागी स्थिर ठेवण्यासाठी स्कॅनपूर्वी नागाला विशेष लोकल नर्व्ह ब्लॉक देण्यात आला, म्हणजेच त्याचा संबंधित भाग बधिर करण्यात आला. त्यामुळे जनरल अ‍ॅनेस्थेशिया न देता त्याला सुरक्षितपणे स्थिर ठेवता आले आणि नंतर स्कॅन करण्यात आले.

कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला?

एफव्हीडीच्या तज्ज्ञांनी हाय-रिझोल्यूशन थिन-सेक्शन इमेजिंग आणि मल्टीप्लेनर रिकन्स्ट्रक्शन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागाच्या शरीराच्या मागील भागाचा स्कॅन केला. सीटी स्कॅनमध्ये नागाच्या उजव्या बाजूच्या एका बरगडीला फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. याशिवाय त्वचेजवळ अनेक ठिकाणी एअर पॉकेट्स तयार झाल्याचे आणि सॉफ्ट टिश्यूंना दुखापत झाल्याचेही निदर्शनास आले.

सापाच्या सीटी स्कॅनबाबत बोलताना फ्रेडना व्हेट डायग्नोस्टिक्सच्या टीमने सांगितले की, वन्यजीव आणि दुर्मिळ प्रजातींच्या उपचारांसाठी प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर किती महत्त्वाचा आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सीटी स्कॅनच्या अहवालानंतर सापावर योग्य उपचार करण्यात आले आणि पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्या नागाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. डॉक्टरांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...