Video: पोरगं ड्रग्ज केसमध्ये अकडलं म्हणून बापाला टेन्शन येत असेल? छे हो, उत्तरासाठी ‘मर्चंट’ बाप लेकाचा व्हिडीओ बघा

| Updated on: Nov 27, 2021 | 10:35 AM

आपल्या वडिलांचा पवित्रा पाहून ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खानचा सहआरोपी अरबाज मर्चंटने अक्षरशः डोक्यावर हात मारला. थांबवा हे बाबा (Stop it dad) असं म्हणत अरबाज तोऱ्यातच तरातरा निघून गेला. जवळच असलेल्या आपल्या गाडीत तो बसला

Video: पोरगं ड्रग्ज केसमध्ये अकडलं म्हणून बापाला टेन्शन येत असेल? छे हो, उत्तरासाठी मर्चंट बाप लेकाचा व्हिडीओ बघा
Arbaz Merchant
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) यांनी शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी (Narcotics Control Bureau – NCB) कार्यालयासमोर हजेरी लावली. यावेळी अरबाजचे ‘फोटोपिसाट’ वडील अस्लम मर्चंट (Aslam Merchant) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट जामिनावर बाहेर आहेत. शुक्रवारी त्यांना एनसीबी कार्यालयात नियमित हजेरी लावायची होती. त्यानंतर बाहेर पडताना एक किस्सा घडला. वायुवेगाने बाहेर जाणाऱ्या अरबाजला त्याचे वडील अस्लम मर्चंट यांनी थांबवलं. क्षणभर भांबावलेल्या अरबाजला कारण समजलं नाही, त्यामुळे तो तसाच उभा राहिला. तेव्हा अस्लम यांनी लेकाला जवळ घेत त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि स्मितहास्य करत मीडियाच्या फोटोग्राफरसमोर पोझ दिली.

अरबाजची प्रतिक्रिया काय?

आपल्या वडिलांचं हे कृत्य पाहून अरबाजने अक्षरशः डोक्यावर हात मारला. थांबवा हे बाबा (Stop it dad) असं म्हणत अरबाज तोऱ्यातच तरातरा निघून गेला. जवळच असलेल्या आपल्या गाडीत तो बसला आणि इकडे वडील अस्लम मर्चंट यांनीही पापाराझींसमोर कसंनुसं हसत काढता पाय घेतला.

पाहा व्हिडीओ :

आर्यन खानचा पापाराझींकडे कानाडोळा

तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये आर्यन खान मात्र छायाचित्रकारांकडे सपशेल दुर्लक्ष करताना आणि पोझ देण्यास न थांबता सरळ एनसीबी कार्यालयात चालत गेल्याचे दिसून आले आहे.

 

ड्रग्ज रेव्ह पार्टीवर छापा प्रकरणात अटकेत

मुंबईहून गोव्याकडे जाणार्‍या क्रूझवरील कथित ड्रग्ज रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. आर्थर रोड तुरुंगात तीन आठवड्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांच्या जामीन आदेशातील अटींनुसार ते दर आठवड्याला एनसीबीसमोर हजर होत आहेत.

संबंधित बातम्या :

पिंपरीतील पेट्रोल बॉम्बचे गूढ उकलले, माजी नगरसेवकाने बर्थडे केक न कापल्याच्या रागातून हल्ला

दारूनं घात केला, आईनं जीव दिला, वडील तुरुंगात, लेकरांच्या डोक्यावरचं छत हरपलं, बीडमध्ये दुःखद घटना!

पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने 5 जणांना चिरडलं; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी