मुंबईत आगीच्या दोन घटना… अंधेरीत MIDC कंपनीला आग, मीरा रोडमध्ये गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग

| Updated on: Feb 08, 2021 | 7:20 AM

मुंबईत 8 फेब्रुवारीच्या पहाटे दोन ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या. पहिली घटना ही मीरा रोड येथे घडली तर दुसरी घटना अंधेरीत घडली.

मुंबईत आगीच्या दोन घटना... अंधेरीत MIDC कंपनीला आग, मीरा रोडमध्ये गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग
Mira Road Fire
Follow us on

मुंबई : मुंबईत 8 फेब्रुवारीच्या पहाटे दोन ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या (Fire At Mira Road And Andheri MIDC). पहिली घटना ही मीरा रोड येथे घडली तर दुसरी घटना अंधेरीत घडली. या घटनांमध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मीरा रोड येथे एका घरगुती गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग लागली तर अंधेरीमध्ये MIDC कंपनीत आगीची घटना घडली (Fire At Mira Road And Andheri MIDC).

पहिली घटना –

मीरा रोड येथील रामनगरच्या प्रेमनगर परिसरातील एका मैदानात उभ्या असलेल्या एचपी गॅस सिलेंडरने भरलेल्या दोन ट्रकला मध्य रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. भीषण आगीमुळे एक-एक करुन जवळपास सात सिलेंडर गॅस बाटल्यांचा ब्लास्ट झाला. घटनास्थळी मीरा-भाईंदर मनपा अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यापैकी एक अग्निशामक दलाचा जवान आहे तर दुसरा व्यक्ती स्थानिक नागरिक आहे. ही आग का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दुसरी घटना –

मुंबईच्या अंधेरी MIDC मध्ये सिप्ज कंपनीच्या तारा ज्वेलर्स कंपनीला रात्री जवळपास 2 वाजता आग लागली होती. ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. ज्यामुळे सुदैवाने कंपनीच कुणीही नव्हतं. कंपनीच्या बेसमेंटमध्ये आग लागली, याची माहिती सिक्युरिटी गार्डने पोलिसांना दिली (Fire At Mira Road And Andheri MIDC).

याघटनेची माहिती मिळताच 6 अग्निशामक दलाच्या गाड्या आणि 10 फायर इंजिन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. मात्र या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नाही (Fire At Mira Road And Andheri MIDC).

संबंधित बातम्या :

Mumbai Mankhurd Fire | मानखुर्दमधील आग पाच तासानंतरही धुमसतीच, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरुच

मुंबई : मानखुर्दमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या 14-15 गाड्या घटनास्थळी दाखल