Fire | फर्निचरच्या कंपाऊंडला भीषण आग, 2 सिलिंडरचा स्फोट, 300 ते 400 दुकानांत भडका, कुठे घडली घटना?

Mumbai Jogeshwari Fire | जोगेश्वरी पश्चिम भागात फर्निचर कंपाउंडला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Fire | फर्निचरच्या कंपाऊंडला भीषण आग,  2 सिलिंडरचा स्फोट,  300 ते 400 दुकानांत भडका, कुठे घडली घटना?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 1:20 PM

गोविंद ठाकूर, मुंबई | सोमवारी सकाळच्या सुमारास मुंबईत भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. जोगेश्वेरी (Jogeshwari) पश्चिमेकडील घास, फर्निचर कंपाउंडमध्ये ही यंकर घटना घडली आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास फर्निचर दुकानांना अचानक आग लागली. एकामागून एक दुकानांत आगीचा भडका होत गेला. एकाला लागून एक दुकानं असल्यामुळे या आगीत शेकडो दुकानं जळून भस्मसात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अग्निशामक दलाच्या 8 ते 10 गाड्या घडनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीचा भडका एवढा प्रचंड आहे की, सकाळी 11 वाजता लागलेली आग दुपारी 1 वाजेच्या सुमारासदेखील पूर्णपणे विझवता आलेली नाही. या आगीत किती जिवितहानी झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही.

Jogeshwari fire

कुठे लागली आग?

जोगेश्वरी पश्चिमेकडील फर्निचर कंपाउंडमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. या भागात बहुतांश दुकानं फर्निचर, काचेची दुकानं आणि गोदामं आहेत. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आग विझवण्याच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्या नाहीत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. फायर ब्रिगेडने लवकर आग विझवण्याचे प्रयत्न केले असते तर बरीच दुकानं वाचली असती, अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत.

1 Jogeshwari fire

शर्थीचे प्रयत्न सुरु

दरम्यान, जोगेश्वरी पश्चिम येथे लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या आगीत लाखोंचे सामान जळून खाक झाले आहे. या आगीत कोणीही अडकल्याची किंवा जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अग्निशमन दल वेळेवर आले असते तर अनेक दुकाने वाचू शकली असती, मात्र अग्निशमन दल उशिरा पोहोचले, अशी स्थानिकांची तक्रार आहे. सध्या 300 ते 400 दुकाने आणि गाळे जळत आहेत, अशी माहिती स्थानिक देत आहेत.

Jogeshwari fire

आकाशात धुरांचे लोट

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची दृश्य अत्यंत विदारक आहेत. फर्निचरच्या दुकानांतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. असंख्य दुकानांमधून अजूनही आगीचे लोट निघत आहे. लाकूड आणि इतर साहित्य जळाल्याने धुराचे आणि आगीचे लोट आकाशापर्यंत गेल्याचं भीषण चित्र इथे दिसून येतंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.