मित्रासोबत बोटीवर फिरायला, ‘गेट वे’जवळ तरुणी समुद्रात पडली आणि…

संबंधित तरुणी तिच्या मित्रासोबत बोटीवर फिरायला गेली होती. मात्र अचानक समुद्रात मोठी लाट आली आणि बोटीला धडकली. त्यामुळे बोटीसोबतचा तिचा तोल गेला आणि ती पडली

मित्रासोबत बोटीवर फिरायला, गेट वेजवळ तरुणी समुद्रात पडली आणि...
गेट वे ऑफ इंडियावर तरुणीची सुटका
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 2:29 PM

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून (Gate Way of India) काही अंतरावर समुद्रात बुडणाऱ्या एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. कोस्टल पोलीस आणि कुलाबा पोलिसांनी तरुणीला सुखरुप बाहेर काढले. मोठी लाट बोटीला धडकल्यामुळे तोल जाऊन तरुणी पाण्यात पडली होती.

नेमकं काय घडलं?

संबंधित तरुणी तिच्या मित्रासोबत बोटीवर फिरायला गेली होती. मात्र अचानक समुद्रात मोठी लाट आली आणि बोटीला धडकली. त्यामुळे बोटीसोबतचा तिचा तोल ढासळला. यानंतर बोटीच्या किनाऱ्यावर बसलेली मुलगी समुद्रात पडली.

मुलीची सुखरुप सुटका

तात्काळ कोस्टल पोलिस आणि कुलाबा पोलिसांच्या गस्त करणाऱ्या पथकांना माहिती देण्यात आली. मुलीची सुखरुप सुटका करण्यात आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात

दुसरीकडे, लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि ट्रक यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे बस अपघाताची घटना घडली.

रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

वादावादीतून टोकाचं पाऊल, आधी बायकोची हत्या, मग नवऱ्याचे विषप्राशन

ट्रकच्या धडकेत लातूर-औरंगाबाद बसचा चेंदामेंदा, भीषण अपघातात सहा जण जागीच ठार, आठ गंभीर

स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, ‘चौघीं’चं झालेलं लिंगबदल